कोरोना ( कोव्हिड-19 ) संसर्गाची भिती कोणाला ? काय करायचे आणि काय करायचे नाही


कोरोना ( कोव्हिड-19 ) संसर्गाची भिती कोणाला ? काय करायचे आणि काय करायचे नाही

कोरोना (कोव्हिड -19) या महामारीने जगाबरोबर भारतातील अनेक लोकांवर परिणाम केला असून ही महामारी दिवसेंदिवस वाढतच आहे.  भारत सरकार आणि राज्य शासन कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर आणि आपल्या राज्यात कठोर उपाययोजना करत आहे.  सरकारने या रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी घालून दिलेल्या  आवश्यक नियमावलीचे प्रत्येक नागरिकांने पालन करुन खबरदारी घेतलीच पाहीजे .  
कोरोना संसर्गाचा सर्वात मोठा धोका हा कमी रोगप्रतिकारक शक्ती व कुमकुवत शरीर असलेल्या वयोवृध्दांना जास्त असतो. त्याचबरोबर मधूमेह, उच्च रक्तदाब, फुफ्फुस तसेच मुत्रपिंडांचा आजार यासारख्या एकापेक्षा जास्त व्याधी असणाऱ्या नागरिकांना सुध्दा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.    त्यासाठी खाली दिलेल्या उपाययोजना कटाक्षाने पाळाव्यात.

हे करा:
▪️घरातच रहा. अभ्यांगतांशी भेटी टाळा. भेटीचे कारण खुपच महत्वाचे असल्यास कमीत कमी एक मीटरचे अंतर राखा.

▪️नियमित अंतराने तुमचे हात आणि चेहरा  पाण्याने व साबणाने धुवा.

▪️शिंक व खोकला आल्यास हातरुमाल, टीश्यु पेपर किंवा हाताचा कोपर याचा वापर करा. वापर झालेल्या टीश्यु पेपरची योग्य विल्हेवाट लावा व हातरुमाल धुवून घ्या.

▪️घरी शिजवलेले ताजे गरम पौष्टीक जेवण करा, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फळाचे ताजे रस प्या.

▪️व्यायाम आणि ध्यानधारणा करा.

▪️जर नियमित ओषधोपचार चालू असेल तर वेळेवर औषधे घ्या.

▪️आपल्या कुटूंबीय (जर आपल्या बरोबर नसल्यास), नातेवाईक,मित्र यांची दुरध्वनी, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोला. गरज असल्यास त्यांची मदत घ्या.
 
▪️मोतीबिंदू शस्त्रक्रिया किंवा गुडघा पुनर्स्थापनेसारख्या आपल्या वैकल्पिक शस्त्रक्रिया असल्यास पुढे ढकला.

▪️वारंवार स्पर्श केलेल्या पृष्ठभागास जंतुनाशकांसह नियमितपणे स्वच्छ करा.

▪️आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवा. जर आपल्याला ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ताबडतोब जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधा आणि त्यांनी दिलेल्या वैद्यकीय सल्ल्याचे पालन करा.

हे नक्कीच करु नका:
▪️आपल्या उघड्या हातावर किंवा आपला चेहरा झाकल्याशिवाय खोकू किंवा शिंकू नका.

▪️जर आपल्याला ताप आणि खोकला येत असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींच्या जवळ जाऊ नका.

▪️डोळे, चेहरा, नाक आणि जिभेला स्पर्श करु नका.

▪️आजारी व्यक्तींजवळ जावू नका.

▪️मनानेच औषध घेऊ नका.

▪️आपले मित्र अथवा जवळच्या व्यक्तींशी हस्तांदोलन, आलिंगने टाळा.

▪️नियमित वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी दवाखान्यात न जाता शक्य असल्यास दुरध्वनीवरुन सल्ला घ्या.

▪️गर्दीच्या ठिकाणी, बाजारामध्ये, तसेच धार्मिक ठिकाणी जाऊ नका.

▪️अत्यावश्यक असल्याशिवाय घराबाहेर जावू नका.


स्वैर अनुवाद : जिल्हा माहिती कार्यालय, सातारा