शेतीकामासाठी   डिझेल उपलब्ध करून देण्याचा निर्णय....पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड येथील बैठकीमध्ये निर्णय


शेतीकामासाठी   डिझेल उपलब्ध करून देण्याचा निर्णय....पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड येथील बैठकीमध्ये निर्णय


कराड - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने  २१ दिवस संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनेसंबंधी  आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील  यांनी कराड येथे घेतली.


संचारबंदीच्या काळात पेट्रोल डिझेल पंप बंद असल्याने शेतीकामासाठी डिझेल मिळत नाही त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. शेतीकामासाठी   डिझेल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासंबंधी योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना दिल्या, तसेच संचारबंदी असून सुद्धा बाहेरील लोक हे गावात, शहरात येत आहेत त्यांची योग्य ती चाचणी करण्यासाठी ग्रामपंचायत , नगरपालिका यांना मार्गदर्शन करावे, तसेच जीवनावश्यक वस्तूचा साठा पुरेसा असल्याने तुटवडा भासणार नाही त्यामुळे किराणा माल, मेडिकल याठिकाणी गर्दी करू नये आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.


नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, सर्व जीवनावश्यक वस्तूंचा साठा उपलब्ध असल्याने किराणा माल तसेच मेडिकल याठिकाणी  गर्दी करू नये, प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नामदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले.


या बैठकीस प्रांत अधिकारी उत्तम दिघे, पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्य कार्यकरी अधिकारी यशवंत डांगे,  तालुका वैद्यकीय अधिकारी  स्वाती देशमुख, पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, आय.पी.धुमाळ  उपस्थित होते.


Popular posts
१५ एप्रिल नंतर मोफत तांदुळ होणार उपलब्ध
साताऱ्यातील 5 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह; 4 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल; यापैकी नऊ महिन्याच्या बाळाचा श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गाने मृत्यू
Image
राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
Image
डॉ. अतुल भोसले यांचा विरोधकांना सवाल...इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले ? त्यांना तुरूंगात का जावे लागले ? या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत 
Image
शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना संचालकपदी प्रा.अभय जायभाये रुजू
Image