कोरोना अनुमानित म्हणून एक महिला व एका पुरुष विलगीकरण कक्षात दाखल....इस्लामपूर येथील रुग्णांच्या संपर्कातील 2  सहवासितांचा रिपोर्ट निगेटीव्ह


कोरोना अनुमानित म्हणून एक महिला व एका पुरुष विलगीकरण कक्षात दाखल....इस्लामपूर येथील रुग्णांच्या संपर्कातील 2  सहवासितांचा रिपोर्ट निगेटीव्ह


कराड :  सातारा जिल्ह्यातील वय 57 वर्षीय एका महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तसेच पॅरिस येथून प्रवास करुन आलेल्या 35 वर्षीय पुरुषाला कोरडा खोकला असल्याने आज दुपारी जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले.  या दोन अनुदमानित रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यात एन.आय.व्ही.कडे पाठविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.



 सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या ठिकाणी कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 2 निकट सहवासितांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन.आय.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.