कराड नगरपालिकेचे थकबाकीदार 21 जणांच्यावर आजपर्यत कारवाई


कराड नगरपालिकेचे थकबाकीदार 21 जणांच्यावर आजपर्यत कारवाई


कराड - नगरपालिकेच्या कर वसुली विभागाने जोरदारपणे कारवाई सुरू केली असून आज 11 मार्च रोजी शहा हाईट्स कोल्हापूर नाका येथील सहयाद्री नागरी पत संस्था, निवृत्ती तुकाराम भोई, विजयकुमार हसमुखलाल चावला येथील 3 खाजगी दुकान गाळे, आणि शनिवार पेठेत शिंदे हॉस्पिटलजवळ विजय विनोद पंकज जयराम ठक्कर यांचा 1 दुकान गाळा असे एकूण 4 खाजगी दुकान गाळे सील केले. तसेच बुधवार पेठेतील 3 खाजगी नळ कनेक्शन बंद करण्यात आली आहेत.आतापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये एकूण ९ व्यवसायिक गाळे व १३ पाणी कनेक्शन बंद केलेले आहेत.


मार्च महिना सुरू असल्याने नगरपालिकेच्या कर विभागाने थकीत रक्कम नगरपालिकेत भरावी यासाठी आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान ज्यांनी थकित रक्कम जमा केली नाही अशा व्यवसायिक गाळयांना सील करण्यात येत असून पाणी कनेक्शन बंद करण्यात येत आहे.कर वसूल विभागाने सातत्याने थकित मिळकतदारांना वारंवार आवाहन करूनही ज्यांनी प्रतिसाद दिला नाही अथवा थकीत रक्कम भरली नाही. त्यांच्यावर गाळा सील करणे, पाणी कनेक्शन बंद करण्याची कारवाई सुरू आहे. रिक्षांमधून थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा मिळकतधारकांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही दिला जातो.


मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनानुसार कराड नगरपालिकेच्या कारवाईमध्ये उपमुख्याधिकारी विशाखा पवार, कर निरीक्षक उमेश महादर, लिपिक इखलास शेख, लिपिक सुरेश जाधव, राजेंद्र ढेरे, जितेंद्र मुळे, जयवंत यादव, पांडुरंग सपकाळ, फिरोज मुजावर, अय्यज शेख, शिपाई राजेश जाधव, झाकीर मुल्ला, खैरतखान या कर्मचारी यांनी सदरची कारवाई केली.