पाटणच्या विकासासाठी 254 कोटी 37 लाखाचा निधी...स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कृषि विज्ञान संकुल होणार.....राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती


पाटणच्या विकासासाठी 254 कोटी 37 लाखाचा निधी...स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कृषि विज्ञान संकुल होणार.....राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती


कराड - पाटण तालुक्यातील विकास कामांसाठी अर्थसंकल्पामध्ये 254 कोटी 37 लाखाचा निधी मिळाला असून राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत मालेगाव (जि. नाशिक) येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कृषिविज्ञान संकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती वित्तराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कराड येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली. 


पाटण तालुक्यातील विविध 18 रस्त्यांसाठी 55 कोटी 60 लाख, लोकनेते बाळासाहेब देसाई जन्मशताब्दीसाठी १५ कोटी, पाटणच्या प्रशासकीय इमारतीसाठी 15 कोटी, पूर संरक्षण भिंतीसाठी ६ कोटी 26 लाख, कोयना पर्यटन विकासासाठी ४ कोटी, पाटण येथील न्यायालयाच्या इमारतीसाठी २ कोटी 22 लाख, पाटण क्रीडा संकुलासाठी ५ कोटी, कोल्हापूर विद्यापीठांमध्ये बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी १ कोटी, त्याचबरोबर मराठवाडी, मोरणा, तारळी जलसिंचन प्रकल्पांसाठी संयुक्तिक 150 कोटी 28 लाख रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचे माहिती वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.


आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने कृषि विज्ञान संकुल मालेगाव येथे उभारण्यात येणार असून यासाठी लागणारा निधी कमी पडणार नाही. असे सांगून मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ग्रह विभागाच्यावतीने दिशा कायद्यासाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त केली असून कोरोना कारणास्तव अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकर उरकण्यात आले. यामुळे दिशा कायदा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संमतीने विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार असल्याचे सांगून राज्यमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले दिशा कायद्यामुळे राज्यातील महिलांच्या संरक्षणाच्या दृष्टीने अधिक कडक कायदा करण्यात येणार आहे. राज्यातील शहीद जवानांच्या वीरपत्नी यांच्यासाठी घर मालमत्ता माफी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.


सातारा शहरातील व्यक्तीवरील मोक्का कायद्याबाबत सूचना करणार


सातारा शहरातील एका व्यक्तीवर मुक्का अंतर्गत कारवाई करताना तीन तपासी अधिकारी बदलण्यात आले. याबाबतची सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या जातील. अशी माहितीही शंभूराज देसाई यांनी दिली.


Popular posts
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतला कोल्हापुर परिक्षेत्रातील.....विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयातील पोलीस अधीक्षकांचा आढावा.
Image
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले पतसंस्थेचे नव्या वास्तूत स्थलांतर
Image
अंत्योदय व केसरी (प्राधान्य कुटुंब लाभार्थी ) कार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप सुरू : तहसीलदार अमरदीप वाकडे 
Image
कराड नगरपालिका व महिला व बालकल्याण समिती..... महिला सक्षमीकरण सकारात्मक चांगले काम
Image
मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी.....सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश