विविध विभागांच्या अनुदानाच्या मागण्या मान्य

विविध विभागांच्या अनुदानाच्या मागण्या मान्य


मुंबई -  विधानसभेत आज विविध विभागांच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा व मतदान होऊन त्या बहुमताने मान्य करण्यात आल्या. सामान्य प्रशासनमहसूल व वनकृषीपशुसंवर्धनदुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसायनगरविकाससार्वजनिक बांधकामजलसंपदाउद्योगउर्जा व कामगारग्रामविकासगृहनिर्माणसहकारपणन व वस्त्रोद्योगपाणीपुरवठा व स्वच्छता आणि मृद व जलसंधारण या विभागांच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या.


तालुका तिथे म्हाडा


गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले की, ‘तालुका तिथे म्हाडा’ निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. तालुक्यांमध्ये म्हाडामार्फत २०० घरे बांधण्यात येतील. यासंदर्भात निर्णय झाला असून प्रत्येक तालुका हा म्हाडाच्या कार्यकक्षेखाली आणला जाईलअसेही ते म्हणाले.


प्रलंबित जलसिंचन प्रकल्पांसाठी भरीव तरतूद


जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील म्हणाले कीजिगांवच्या प्रकल्पाला गती देण्यात येत आहे. मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. जलसिंचनाचे प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रथमच मोठी आर्थिक तरतूद केली आहे. मराठवाडाविदर्भउत्तर महाराष्ट्रासह इतर ठिकाणचे प्रलंबित जलसिंचन प्रकल्प पूर्ण केले जातीलअसेही ते म्हणाले. 


यासंदर्भात झालेल्या चर्चेमध्ये सदस्यांनी मांडलेल्या विविध मागण्याप्रस्तावसूचना यांची नोंद घेण्यात आली असून सर्व मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईलअशी ग्वाही संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी दिली. विभागाचा अर्थसंकल्प मान्य करण्यात यावाअशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर बहुमताने  या विभागांच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कोरोना लस संशोधन प्रकल्पात कृष्णा हॉस्पिटलचा सहभाग कराडचे नाव झळकणार जगाच्या नकाशावर; पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून लस विकसित
Image
6 जणांचे अहवाल आले पॉझिटिव्ह 14 जण निगेटिव्ह तर 139 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला
जिल्हा परिषद पाझर तलावांची ठेका रक्कम कमी करावी..... सातारा जिल्हा मत्स्यव्यवसाय संघाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन  
Image
पुरोगामित्वाची बूज राखणारा साक्षेपी संपादक हरपला.... अनंत दीक्षित यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
Image