शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 31 मार्च  पर्यंत घरातू काम करण्याची परवानगी 

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 31 मार्च  पर्यंत घरातू काम करण्याची परवानगी 


 सातारा -  : राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून शासनाने  राज्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालय दिनांक 31 मार्च,2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शासकीय, खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, विना अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यीत इयत्ता 1 ली ते 8 वी च्या अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांची एप्रिल,2020 च्या पहिल्या आठवड्यात संकलीत मुल्यमापन चाचणी २ होणे नियोजित होते. तथापि सद्यस्थितीत दिनांक 31 मार्च,2020 पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.


 तसेच राज्यातील शासकीय, खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, विना अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यीत इयत्ता 1 ली ते 8 वी च्या परीक्षा रद्द करण्यात येत असून सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापन अंतर्गत इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांचे वर्षभर आकारिक व साकारिक मुल्यमापन करण्यात येत असते त्या आधारावर विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात यावा.राज्यातील शासकीय, खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित,विना अनुदानित,स्वयं अर्थसहाय्यीत इयत्ता 9 वी व 11 वी ची परीक्षा 15 एप्रिल  2020 नंतर घेण्यात यावी.


राज्यातील शासकीय,खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित,विना अनुदानित,स्वयं अर्थसहाय्यीत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 31 मार्च,2020 पर्यंत (एसएससी बोर्ड परीक्षेशी संबंधित कामे वगळून) घरातून कामे करण्याची परवानगी देण्यात येत आहे.  एसएससी बोर्ड च्या परीक्षा वेळापत्रकानुसारच घेतल्या जातील तथापि सदर परीक्षेनंतर एसएससी बोर्ड परीक्षेसंबंधी काम करणाऱ्या राज्यातील शासकीय, खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, विना अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 31 मार्च, 2020 पर्यंत घरातुन काम करण्याची परवानगी देण्यात येत आहे, असे राजेश क्षीरसागर, शिक्षणाधिकारी (माध्य) सातारा जिल्हा परिषद सातारा यांनी कळविले आहे.