शिखर शिंगणापूर येथील श्री. शंभु महादेवाच्या यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल.... कलम  36  लागू

शिखर शिंगणापूर येथील श्री. शंभु महादेवाच्या यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल.... कलम  36  लागू


सातारा - शिखर शिंगणापूर येथील श्री शंभु महादेवाची यात्रा 25 मार्च ते 7 एप्रिल 2020 या कालावधीत साजरी होणार आहे. या यात्रेकरीता येणार भाविक हे फलटण मार्गे शिखर शिंगणापूर येथे जाणार असल्याने या मार्गावर वाहतुकची कोंडी होवू नये यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 34 नुसार दि.5 एप्रिल रोजी सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत शिंगणापूर ते कोथळे-आंदरुंड-जावली-मिरढे-वडले-सोनवडी मार्गे फलटणकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच या मार्गावरुन फलटण बाजुकडे येणारी वाहतूक दहिवडी मार्गे किंवा नातेपुते मार्गे फलटणकडे वळविण्यात येत आहे. याची सर्व वाहन धारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.


माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथील श्री शंभु महादेवाची यात्रा व पाटण तालुक्यातील बनपुरी येथील श्री. नाईकबाबा यात्रेच्या  निमित्ताने  मिवरणुकांचे व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मिरवणुक कोणत्या मार्गाने व कोणत्या वेळी काढवी किंवा काढु नये.मिरवणुकीतील व्यक्तींचे वर्तन कसे असावे, आणि ध्वनी प्रदुषणाच्या अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे यासाठी, तेजस्वी सातपुते पोलीस अधिक्षक सातारा यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसार, कायदा व सुव्यवस्थेच्या बदोबस्त कामी नेमलेल्या सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस निरीक्षक, सर्व सहा. पोलीस निरीक्षक, सर्व पोलीस उप निरीक्षक यांच्यासह बंदोबस्तावरील अन्य सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दि. 25 मार्च ते 7 एप्रिल (दोन्ही दिवस धरुन) या कालावधीत   त्या-त्या पोलीस ठाणे हद्दितील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून व मा.सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे यादृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.


शस्त्र व जमावबंदी आदेश कलम 37 (1)  (3)  जारी


जिल्ह्यात     शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी सुनिल थोरवे  यांनी मुंबई पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम  37(1) व  (3) नुसार संपूर्ण सातारा जिल्ह्यात सण, यात्रा व उत्सवाचे कार्यक्रम वगळून  दिनांक 12 मार्च रात्री 24.00 वा. पर्यंत शस्त्रबंदी जमावबंदी आदेश जारी केला आहे.  या कालावधीत सातारा जिल्ह्याच्या हद्दीत कोणत्याही जमावास किंवा मिरवणुकीस मनाई करण्यात आली आहे. या मनाई   आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. शांततेच्या मार्गांनी एकत्र येवून कार्यक्रम साजरा करण्यासाठी  पोलीसअधीक्षक किंवा संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची, संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांची  पूर्वपरवानगी घेतली असल्यास तसेच यात्रा, धार्मिक कार्य, लग्न विधी कार्य तसेच अंत्यविधी कार्यास हा जमावबंदी आदेश लागू होणार नाही, असेही  आदेशात नमूद करण्यात आले आहे.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पोलंड येथे राहणाऱ्या आपल्या राज्यातील वनसगांवचे वैभव शिंदे यांनी लिहीलेली ही पोस्ट... मुद्दाम आपणा सर्वांसाठी वाचा आणि सगळ्यांना सांगा.... जीवन सुंदर आहे दक्षता घेऊ या...!
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह
Image
48 तासात बँकेत जमा झाली रक्कम.....शेतकऱ्यांना चैतन्य देणारी कर्जमुक्ती