लाँकडाऊनच फायदा घेत अंबडमधील सव्हे नं 36 मधील आरक्षित जागेवर अनाधिकृत बांधकाम सुरु


लाँकडाऊनच फायदा घेत अंबडमधील सव्हे नं 36 मधील आरक्षित जागेवर अनाधिकृत बांधकाम सुरु


जालना - देशासह राज्यात कोरोना आजारामुळे देशात लाँकडाऊन असतांना माञ अंबड येथिल सव्हे नंबर 36 मधील नगर परिषदेच्या ताब्यातील डीपी आरक्षित जागेवर चक्क बांधकाम चालू झाले आहे. 


अंबड गट नंबर 36 ब खुली जाग डिपी रिजर्वेशन 16127 स्वेअर मीटर आहे. यात वेगवेगळ्या उदीष्टासाठी जागा आरक्षित आहेत याबाबत काँलनीवाशीयांनी गेल्या वर्षभरात अनेकवेळा जिल्हाधिकारी (जालना), उपविभागीय अधिकारी (अंबड), मुख्याधिकारी नगर परीषद अंबड यांना वारंवार तक्रारी केल्या तसेच लोकशाही दिनातही तक्रार करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय नगर विकास विभागाकडुन तात्काळ अतिक्रमण काढावे असे मुख्याधिकारी यांना दोनवेळा सुचीतही करण्यात आले याबरोबरच उपविभागीय अधिकारी यांनीही गरज पडल्यास पोलीस बंदोबस्त घेऊन अतिक्रमण काढावे असे मुख्याधिकारी यांना सुचित करण्यात आले माञ याबाबत अद्यापर्यत नगर परीषदेकडुन कारवाई झाली नाही हे विशेष.


सद्यस्थीतीत देशभरात कोरोना आजाराने जनता ञस्त असतांना देशभरात लाँकडाऊन असतांनाही अंबड येथिल नगर परीषदेच्या प्लँनप्रमाने आरक्षित असलेल्या जागेवर पक्के बांधकाम चालु झाले आहे. यामुळे याकडे संबंधित विभागाने तात्काळ लक्ष देऊन चालु असलेले बांधकाम थांबवुन आरक्षित जागेवर झालेले व होत असलेले अतिक्रमण तात्काळ काढावे अशी मागणी होत आहे.