48 तासात बँकेत जमा झाली रक्कम.....शेतकऱ्यांना चैतन्य देणारी कर्जमुक्ती
सातारा - केवळ 48 तासात शेतकऱ्यांच्या खात्यावरील 2 लाख रुपयांपर्यतची रक्कम उणे होवून तो कर्जमुक्त होत आहे. बँकेला ताण ना यंत्रणेवर ताण अशी कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चांगलेच हास्य पसरवत आहे. सातारा जिल्ह्यात 46 हजार 496 शेतकऱ्यांच्या खात्यावर 289 कोटी 29 लाख एवढी कर्ज रक्कम बँकेत जमा झाली आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 63 हजार 943 शेतकरी खातेदारांची यादी संकेतस्थळावर आपलोड करण्यात आली असून त्यापैकी 52 हजार 323 खातेदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहाकरी बँकेकडील 38 हजार 926 व अन्य बँकांकडील 25 हजार 17 असे एकूण 63 हजार 943 शेतकऱ्यांची यादी संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. यामधील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील 36 हजार 342 व अन्य बँकांकडील 15 हजार 981 असे एकूण 52 हजार 323 शेतकऱ्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील 35 हजार 731 खातेदारांची व अन्य बँकांकडील 12 हजार 992 खात्यांचे प्रमाणिकरण करण्यात आले आहे. मध्यवर्ती बँकेकडील 611 व अन्य बँकांकडील 2 हजार 989 असे एकूण 3 हजार 600 खात्यांचे प्रमाणिकर झालेले नाही. तसेच जिल्हयातील 46 हजार 496 शेतकऱ्यांच्या खात्यात 289 कोटी 29 लाख रुपये संबंधित शेतऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याचेही जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांनी कळविले आहे.