लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये दीपाली कोळेकर राज्यात पहिली


लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये दीपाली कोळेकर राज्यात पहिली


कराड  - पाटण येथील दीपाली सूर्यकांत कोळेकर ही राज्यसेवा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात पहिली आली आहे. दीपाली कोळेकर हिचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पाटण येथे झाले असून तिने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेत सातारा जिल्ह्याचा नावलौकीक होत असून यंदाही त्याची परंपरा कायम राहिली आहे. 


दीपालीचे वडील सूर्यकांत हे शिक्षक आहेत. दीपाली स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होती. 2018 मध्ये तिने एमपीएससीची फौजदार परीक्षा दिली होती. या परीक्षेत पूर्व, मुख्य व शारीरीक चाचणी देऊन मुलाखत झाली. याचा निकाल नुकताच आला आहे. यामध्ये ती राज्यात मुलींमध्ये पहिली आली. तिला एकूण 261 मार्क पडले आहेत. दरम्यान, दीपालीने मिळवलेल्या यशाचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया तिच्या कुटुंबीयांनी दिली.


परिस्थितीमुळे वडिलांना स्पर्धा परीक्षा देता आल्या नाहीत. मात्र, मुलींनी प्रशासनात अधिकारी व्हावे, हे स्वप्न मनाशी ठेऊन आम्हाला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मन लावून अभ्यास केला आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम आले, याचा मला सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रिया दीपाली कोळेकर हिने व्यक्त केले आहे.