महाबळेश्वर येथे पर्यटक येण्यावर कोणताही प्रतिबंध नाही ; मात्र आवश्यकता असेल तरच प्रवास करावा

महाबळेश्वर येथे पर्यटक येण्यावर कोणताही प्रतिबंध नाही ; मात्र आवश्यकता असेल तरच प्रवास करावा


सातारा - महाबळेश्वर येथे येण्यास कोणासही प्रतिबंध करण्यात आला नाही. समाज माध्यमात चुकीचा मेसेज फिरत आहे त्यावर विश्वास ठेवू नये, मात्र अत्यावश्यक गरज असेल तरच प्रवास करावा असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. काल रात्री काही व्हाट्सअप ग्रुपवर जिल्हाधिकारी यांच्या नावाचा वापर करून  " "कोरनो" सातारा ब्रेकिंग:- येत्या सोमवार दिनांक 16 मार्च 2020 पासून  महाराष्ट्राचे मिनी काश्मीर ओळखले जाणारे ठिकाण महाबळेश्वर पर्यटनासाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे." असा चुकीचा संदेश फिरत आहे.  अशा कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये वेळच्या वेळी जिल्हाधिकारी पत्रकार परिषद घेऊन अथवा जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून आवाहन करत आहेत. अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. अफवा पसरविणाऱ्यावर सायबर कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल.  अफवा पसरविणाऱ्यावर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची नजर आहे.  अथवा कोणाला असे संदेश दिसले तर ताबडतोब प्रशासनाच्या अथवा पोलिसांच्या नजरेस आणून द्यावे जेणे करून अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन ही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.  


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
कृष्णा हॉस्पिटल, डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले यांची बदनामी करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल....भामट्याचे नाव उघड करा पत्रकारांची मागणी 
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
स्वखर्चानी शिवभक्तांनी केला शंभू महादेव मंदिराचा जीर्णोद्धार
Image