लॉकडाऊन  असाही परिणाम...पुणे जिल्ह्यात आज नवीन रुग्ण नाही


लॉकडाऊन  असाही परिणाम...पुणे जिल्ह्यात आज नवीन रुग्ण नाही


पुणे - पुणे विभागामध्ये कोरोना सांसर्गिक रुग्ण संख्येमध्ये आज कोणतीही नव्याने वाढ झाली नसून आज दि. 26 मार्च 2020 रोजी दुपारी 2.00 वाजेपर्यंत एकुण रुग्ण संख्या 42 आहे.  [त्यापैकी सांगली जिल्हयामध्ये-9, पुणे जिल्हयामधील पुणे महानगरपालिका क्षेत्रातील-19 व पिंपरी चिंचवड क्षेत्रातील-12 त्याचप्रमाणे सातारा जिल्हयामध्ये-2  ]


  एन.आय.व्ही.संस्थेकडे पाठविलेले एकूण नमूने 926 होते. त्यापैकी 862 नमून्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून 64 चा अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालापैकी 814 नमूने निगेटीव्ह आहेत व 42 नमूने पॉझिटीव्ह आहेत.


शासनाने दि.24 मार्च 2020 च्या रात्री 12.00 वाजेपासून 21 दिवस संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन करण्याचे आदेश निर्गमित केलेले आहे. त्यानूसार पुणे विभागामध्ये नियोजनबध्द अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली आहे.


 नागरिकांनी अफवांना बळी पडू नये. तसेच शासनाकडून वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे. पोलिस यंत्रणा ही नियमनासाठी असून त्यांच्याशी निष्कारण वाद घालू नये. आपल्या सुरक्षेसाठी कृपया घराबाहेर पडू नये. भाजीपाला व अन्नधान्याचा पुरवठा नियमित होईल, याची प्रशासनामार्फत दक्षता घेण्यात येत आहे. तसेच किरकोळ विक्रेत्यांकडून खरेदी करतांना किमान तीन फुटांचे अंतर ठेवून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याबाबत सांगली महानगरपालिकेने शहरातील अन्नधान्य व भाजीपाला घरपोच सेवा देणा-यांची यादी तयार करुन त्याप्रमाणे सर्व नागरिकांना अवगत केले आहे. अशाच प्रकारची कार्यवाही सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत करण्यात येत आहे.


पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(पीएमपीएमएल) च्या 88 बसेसच्या 790 फे-यांव्दारे एकुण 2921 प्रवाश्यांनी दि.25/03/2020 रोजी प्रवास केला आहे.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
शहरी व ग्रामीण क्षेत्रातील कंपन्यांना...अटी व शर्तीवर उद्योग सुरु करण्यास परवानगी...जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Image
पासपोर्ट कसा मिळवावा
Image
जिल्हा वार्षिक नियोजनचा 2020-21 चा आराखडा मंजूर 2019-20.....च्या पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता.....विकास कामे वेळेत पूर्ण करा; मार्च अखेर निधी खर्च करा........पालकमंत्री बाळासाहेब पाटील
Image
जिल्हा परिषद पाझर तलावांची ठेका रक्कम कमी करावी..... सातारा जिल्हा मत्स्यव्यवसाय संघाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन  
Image