कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ए.बी.आय.टी. च्या ५ विद्यार्थ्यांची निवड


कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ए.बी.आय.टी. च्या ५ विद्यार्थ्यांची निवड


सातारा- विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शेंद्रे येथील अभयसिंहराजे भोसले तंत्रशिक्षण कॉलेजमध्ये बारामती येथील पियाजो व्हेईकल प्रा. लि. या कंपनीमार्ङ्गत घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये कॉलेजच्या पाच विद्यार्थ्यांची निवड झाली. या पाचही विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी अभिनंदन केले.


ग‘ामिण भागातील मुलांना तंत्रशिक्षणाची कवाडे खुली होण्याच्या उद्देशाने सौ. वेदांतिकाराजे यांनी शेंद्रे येथे अभयसिंहराजे भोसले तंत्रशिक्षण महाविद्यालय सुरु केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, त्यांची जगाच्या पाठीवर कुशल अभियंता अशी वेगळी ओळख निर्माण व्हावी, हा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न या तंत्रनिकेतनमध्ये प्रामु‘याने केला जातो. तंत्रनिकेतनमध्ये बारामती येथील पियाजो कंपनीमार्ङ्गत नुकताच कॅम्पस इंटरव्ह्यू झाला होता. कंपनीच्या एच.आर.ए. विभागातील अधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांची लेखी परिक्षा घेवून मुलाखती घेतल्या होत्या. यामध्ये ए.बी.आय.टी. कॉलेजमधील रिंकू इंगवले, प्रतमा चतुर, अंकिता जाधव, श्‍वेता महाडिक, अजित धामणकर या पाच विद्यार्थ्यांची निवड कंपनीमार्ङ्गत झाली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सौ. वेदांतिकाराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य एस.यु. धुमाळ, उपप्राचार्य आर.डी. नलवडे, कार्यालयीन अधिक्षक एस. एस. भोसले, विभागप्रमुख, सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई शिवसेना पक्षवाढीसाठी आघाडीवर... शासनाच्या माध्यमातून पक्षसंघटनेला बळकटी देण्याचा प्रयत्न......मंत्रीपदाच्या ५० दिवसात दाखवून दिला उल्लेखनीय कार्याचा करिष्मा
Image
कोरोना ( कोव्हिड-19 ) संसर्गाची भिती कोणाला ? काय करायचे आणि काय करायचे नाही
Image
  "कृष्णा"मधून आजच्या 6 रुग्णांबरोबर 12 रुग्ण बरे झाले कोरोना संकटावर मात : आशादायक व सकारात्मक चित्र
Image