मलकापूरच्या वाढीव विकास निधीचा सकारात्मक विचार करू - जिल्हाधिकारी शेखर सिंग


मलकापूरच्या वाढीव विकास निधीचा सकारात्मक विचार करू - जिल्हाधिकारी शेखर सिंग


कराड - सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी यांची दर तीन महिन्यांनी होणाऱ्या मीटिंगमध्ये विकासात्मक प्रस्तावाचा सकारात्मक विचार केला जाईल. त्याचबरोबर मलकापूर नगरपरिषदेच्या विकास कामासाठी वाढीव निधी मंजूर करण्यासाठी निर्णय घेण्यात येईल. असे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी सांगितले.


मलकापूर शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता 24x7 नळपाणीपुरवठा योजनेअंतर्गत वाढीव नळकनेक्शनची मागणी वाढत असलेचे दिसुन येते आहे, यासाठी नळपाणीपुरवठा योजना बळकटीकरण करणे, घनकचरा प्रकल्प, आगाशिवनगर भागात मलकापूर शहर विकास आराखड्यामध्ये आरक्षित जागेमध्ये स्मशानभूमी, दफनभूमीसाठीचा प्रस्ताव, शहरातील खराब रस्ते यासाठी निधी आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 576 मंजूर घरकुलासाठी वाढीव प्रत्येकी एक लाख अनुदानाची आवश्यकता असलेने जिल्हा नियोजन मंडळा अंतर्गत वाढीव निधी मिळवा यासाठी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्याकडे प्रस्ताव सादर केले आहेत.