60 वर्षीय महिला विलगीकरण कक्षात दाखल तर ; 7 निकट सहवासितांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविणार

60 वर्षीय महिला विलगीकरण कक्षात दाखल तर ; 7 निकट सहवासितांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविणार


 सातारा : सातारा जिल्ह्यातील एका 60 वर्षीय महिलेचा 2 दिवसांपूर्वी कोविड-19 आजाराचा संसर्ग झालेल्या महिलेशी निकटचा संपर्क आला असल्याने व तिला कोरडा खोकल्याचा त्रास होत असल्याने, आज सकाळी विलगीकरण कक्षात दाखल करुन तिच्या घशातील स्त्रावाचा नमुना एन.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आला आहे.


       तसेच  कोविड-19 या आजाराने बाधित असलेल्या रुग्णांच्या कुटुंबातील 7 निकट सहवासितांचे घशातील स्त्रावाचे नमुनेही एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात येत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी सांगितले आहे.