प्रा. सुनील पानस्कर यांना राष्ट्रीय निसर्ग मित्र पुरस्कार प्रदान


प्रा. सुनील पानस्कर यांना राष्ट्रीय निसर्ग मित्र पुरस्कार प्रदान


कराड - निसर्ग संवर्धन काळाची गरज आहे. लोकसंख्येच्या प्रचंड वाढीमुळे निसर्गाचे संतुलन बिघडत आहे. निसर्ग संवर्धन केल्याषिवाय पर्याय नाही. हे काम विनामोबदला व निरपेक्ष भावनेने करावे लागते. प्रा. सुनिल पानस्कर हे पाटण तालुक्यात अनेक वर्ष निसर्ग संवर्धनाचे काम करीत आहेत. त्याच्या कार्याची दखल घेवून राष्ट्रीय निसर्गमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. असे प्रतिपादन प्राचार्य डाॅ. एस.आर. पाटील यांनी व्यक्त केले.


लायन्स क्लब आॅफ कोल्हापूर ट्रस्ट, व देषभक्त आनंदराव बळवंतराव नाईक आर्टस अॅण्ड सायन्स काॅलेज, चिखली (ता. शिराळा) यांच्या सामंजस्य करारातंर्गत यावर्षीचा राष्ट्रीय निसर्गमित्र पुरस्कार प्रा. सुनिल पानस्कर यांना प्रदान करण्यात आला. पर्यावरण संरक्षण व निसर्गसंवर्धन क्षेत्रात काम करणा-या व्यक्ती व संस्थांना गेली 12 वर्ष राज्यपातळीवरील निसर्गमित्र पुरस्कार प्रदान केलो जातो. प्रा. सुनिल पानस्कर पाटण यांना कर्नाटक विद्यापीठाचे डाॅ. मन्नस्वामी डेव्हीड यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.


प्रा. सुनिलराव पानस्कर गेली 32 वर्षे सातारा जिल्हयात विषेषत पाटण तालुक्यात निसर्ग संवर्धनाचे काम करतात. निसर्ग षिबीरे, चर्चासत्रे, परीसंवाद, वृक्षारोपन, वनवा थांबवणे, जंगल भ्रमंती, प्लास्टीक मुक्ती, वनव्यवस्थापन, निसर्ग स्पर्धा, व्याख्याणे या विविध माध्यमातुन पर्यावरण रक्षणाचे काम करतात. बाळासाहेब देसाई काॅलेजमधील निसर्ग प्रेमी मंडळ व सहयाद्री अॅडव्हेंचर्स या संस्थाच्या माध्यमातून चळवळी चालवल्या जातात. 2016 रोजी त्यांना वनसंरक्षण व व्यवस्थापन संदर्भात वनखात्यास सहकार्य केल्याबध्दल जिल्हाधिकारी यांचे हस्ते सन्मानीत करण्यात आले होते.


राष्ट्रीय निसर्ग मित्र पुरस्कार मिळाल्याबध्दल विक्रमसिंह पाटणकर, अमरसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, याज्ञसेन पाटणकर, कोयना षिक्षण संस्था पाटणचे अध्यक्ष, डाॅ. सोपानराव चव्हाण, प्राचार्य डाॅ. एस. डी. पवार, वनाधिकारी श्री. विलास काळे यांनी अभिनंदन केले.


Popular posts
सेवा सोसायटीनी उद्योगाला कर्ज दिले तर प्रत्येक गाव सक्षम होईल 
Image
‘कृष्णा’च्या रोगनिदान प्रयोगशाळेला ‘कोविड-19’च्या टेस्ट करण्यास मान्यता....आता कराडमध्येच होणार कोरोना चाचणी; सातारा जिल्यातील एकमेव प्रयोगशाळा
Image
मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी हद्दीवर रोखलेला कोरोना अखेर कराडमध्ये दाखल झाला....वैद्यकीय अधीक्षक प्रकाश शिंदे यांच्यावर कारवाई करावी...कोविड कक्ष उपजिल्हा रुग्णालयाऐवजी सह्याद्री हॉस्पिटलला हलवण्याची मागणी
वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित २१ हजार व्यक्तींचे कोरोना लढ्यात सहभागी होण्यासाठी अर्ज...सबंधित जिल्ह्यांमध्ये नियुक्त्या देणार 
राज्यातील पालखी सोहळा प्रमुखांच्या समन्वय समितीची बुधवारी बैठक....आषाढीवारी बाबत होणार निर्णय
Image