कराड नगरपरिषद कर वसुली विभागाची कारवाई सुरुच एकूण 7 गाळे सील तर 32 पाणी कनेक्शन बंद


कराड नगरपरिषद कर वसुली विभागाची कारवाई सुरुच
एकूण 7 गाळे सील तर 32 पाणी कनेक्शन बंद


कराड - मार्च महिन्यात कर वसुली विभागाने थकबाकी पोटी आजअखेर 32 नळ कनेक्शन व 7 खाजगी दुकान गाळे सील केले आहेत. वर्षाअखेर असल्याने दंडाची, व्याजाची आकारणी होणार आहे. नागरीकांची घरपट्टी व पाणीकर भरण्यासाठी नगरपरिषदेत गर्दी होत आहे. कर वसुली विभागाने सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व शनिवार, रविवार या दिवशीही मिळकतधारकांना घरपट्टी व पाणीकर भरण्यासाठी सोईचे होण्यासाठी करवसुली विभाग सुरु ठेवला आहे. 


मार्च महिना व वर्षाअखेर सुरु असल्याने थकबाकी मिळकतधारकांवर कारवाई सुरु असून दोन दिवसांत कराड नगरपरिषदेच्या कर वसुली विभागाने वसुली मोहिम तीव्र केली असून 20 नळ कनेक्शन शनिवार पेठेतील मोहिते हॉस्पीटल परिसर, शिंदे गल्ली, रैनाक गल्ली, चर्चसमोरील परिसर, मुजावर कॉलनी, मंगळवार पेठ या भागातील नळ कनेक्शन बंद केली. असून 2 खाजगी दुकान गाळे मोहिते हॉस्पीटल परिसरातील सील केले आहेत.


सदरची कारवाई मुख्याधिकारी यशवंत डांगे यांचे मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक उमेश महादर, उपमुख्याधिकारी विशाखा पवार यांचे अधिपत्याखाली लिपीक, ईखलास शेख,  जयवंत यादव, सुरेश जाधव, अययाज आत्तार, जितेंद्र मुळे, फिरोज मुजावर, सादिक मुल्ला, राजेंद्र ढेरे, सुनिल बसरगी, फैययाज शेख, पांडुरंग सपकाळ, तसेच शिपाई मनोहर कारंडे, राजेंद्र जाधव, रशिद दिवाण, जगन्नाथ शिंदे, सुभाष पवार, अधिक कोळेकर, विठ्ठल मोहिते, झाकीर मुल्ला, फारुक खैरतखान इ. कर्मचा-यांनी कारवाई केलेली आहे.


घरपट्टी व पाणीकर थकबाकी असलेल्या मिळकतधारकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या मिळकतीची घरपट्टी व पाणीकर थकबाकीची रक्कम लवकरात लवकर नगरपरिषदेत भरुन जप्तीची, पाणी कनेक्शन व ड्रेनेज कनेक्शन कट करणे, थकबाकीदारांची नांवे वर्तमान पत्रात, फलेक्स बोर्डवर प्रसिध्द करणे यासारखी कटू कारवाई टाळावी.


मार्च महिन्यात कर वसुली विभागाने थकबाकी पोटी आजअखेर 32 नळ कनेक्शन व 7 खाजगी दुकान गाळे सील केले आहेत. तसेच वर्षाअखेर असल्याने व दंडाची, व्याजाची आकारणी होणार असलेने नागरीकांची घरपट्टी व पाणीकर भरण्यासाठी नगरपरिषदेत गर्दी केली आहे. मार्च महिना असल्याने कर भरण्यासाठी नगरपरिषद कर वसुली विभागाने सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व शनिवार, रविवार या दिवशीही मिळकतधारकांना घरपट्टी व पाणीकर भरण्यासाठी सोईचे होण्यासाठी करवसुली विभाग सुरु ठेवलेला आहे. तरी मिळकतधारकांनी सुट्टीच्या दिवशीही आपला कर भरावा असे आवाहन मुख्याधिकारी यशवंत डांगे, कर निरीक्षक उमेश महादर व उपमुख्याधिकारी श्रीमती विशाखा पवार यांनी केलेले आहे.