वृत्तपत्र विक्रेते मोहन कुलकर्णी यांचा आज एकसष्ठी सोहळा


वृत्तपत्र विक्रेते मोहन कुलकर्णी यांचा आज एकसष्ठी सोहळा


कराड - वृत्तपत्र विक्रेते व सुसंस्कृत व्यक्तिमत्व
असलेल्या मोहन वासुदेव कुलकर्णी यांचा एकसष्ठी सोहळा रविवार, दि. 15 मार्च रोजी हॉटेल अलंकार येथे सकाळी 11 वाजता होत आहे.


मोहन कुलकर्णी यांचे वडील वासुदेव कुलकर्णी हे पोलीस खात्यात नोकरीस होते. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचे सर्व कुटुंब कराड येथे स्थायिक झाले. प्रारंभी मोहन कुलकर्णी यांनी दिलखूप वाचनालय व श्री मोघे यांच्याकडे नोकरी केली. त्यानंतर त्यांनी वृत्तपत्र विक्रीचा स्वतंत्र व्यवसाय सुरु केला.40 वर्षाहून अधिककाळ ते मोहन कुलकर्णी हे या क्षेत्रात
कार्यरत आहेत. त्यांच्या या कामात त्यांच्या पत्नी शोभा त्यांना मोलाची साथ मिळत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करताना त्यांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले आहे. मुलगा कपील हा जयपूर येथे प्रख्यात कंपनीत उच्चपदावर अधिकारी आहे. तर मुलीही उच्चशिक्षित आहेत.