पुण्याच्या युवकाला पाच लाखाला गंडा

पुण्याच्या युवकाला पाच लाखाला गंडा


कराड - अमेरिकन डॉलर किंवा अर्धा किलो सोने देण्याच्या बहाण्याने पुण्यातील युवकाला तब्बल पाच लाखांचा गंडा घातल्याची खळबळजनक घटना कराड येथे घडली. डॉलरऐवजी कागदांनी भरलेली बॅग देत पाच लाख घेऊन परप्रांतिय संशयितांनी भरदिवसा पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच कराड पोलिसांनी शहरात नाकाबंदी करत संशयितांचा शोध सुरू केला.


दरम्यान नेमकी ही घटना खरी आहे का? याचाही तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेसह कराड पोलीस करत आहेत. युवकाने सांगितलेल्या घटनाक्रमावरून पोलीस सर्व शक्यता गृहीत धरून चौकशी करत आहेत. घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, पुण्यातील वारजे माळवाडी येथील एका युवकाची काही परप्रांतियांशी पुण्यातच ओळख झाली. परप्रांतियांनी त्या युवकाला अमेरिकन 1600 डॉलर व अर्धा किलो सोने आपल्याकडे असल्याची बतावणी केली. सोने किंवा अमेरिकन डॉलर पाहिजे असतील तर पाच लाखांची जुळणी कर, असेही त्यांनी युवकास सांगितले. त्यानुसार गेले महिनाभर युवकाने व्याजाने व इतर मार्गाने पाच लाखांची रक्कम जुळवली. संशयित परप्रांतियांनी हा व्यवहार पुण्यात करायला नको, असे सांगत युवकास मंगळवारी 10 मार्च रोजी कराडला बोलवून घेतले. कराडातील मंडई परिसरात गर्दीच्या ठिकाणी पाच लाख घेऊन आलेला युवक व परप्रांतियांची बोलणी रस्त्यावरच सुरू होती. त्यानंतर संशयितांनी युवकाकडून पाच लाख रूपये घेतले व त्याच्या बॅगेत कागदात गुंडाळून ठेवलेल्या 1600 अमेरिकन डॉलर ठेवल्याचा बहाणा केला. 


पाच लाख हातात मिळताच संशयितांनी तेथून पलायन केले. थोडय़ा वेळाने त्या युवकाने डॉलर तपासले असता ते फक्त कागद निघाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने कराड शहर पोलीस ठाणे गाठले. त्या युवकाने सांगितलेल्या घटनाक्रमानुसार कराड शहर पोलीस, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथकाने तपास सुरू केला. तो युवक सांगतोय ती घटना सत्य आहे का? याचीही खात्री करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी खबरदारी म्हणून नाकाबंदी करत संशयितांचा शोध सुरू करण्यासाठी कराड बसस्थानक, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे स्टेशनवर तपास सुरू केला होता. 


Popular posts
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image