साखर कारखान्यांनी कर्मचाऱ्यांसाठी अनुषंगीक बाबींची व्यवस्था करणे बंधनकारक


साखर कारखान्यांनी कर्मचाऱ्यांसाठी अनुषंगीक बाबींची व्यवस्था करणे बंधनकारक


 कराड - सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून सातारा जिल्ह्यामधील सर्व साखर कारखानदारांनी त्यांच्या आस्थापनेवरील (उदा. ऊस तोड करणारे मजूर, कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी) सर्व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची जाणे-येण्याची, त्यांच्या जेवण, निवास इतर अनुषंगीक बाबींची व्यवस्था करणे तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने मास्क, सॅनिटायझरस्, साबण इत्यादी पुरविणे बंधनकारक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आहेत.


या आदेशाचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास साथराग प्रतिबंधात्मक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये व भारतीय दंड संहिता कलम 188 चे कलमान्वये कडक कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.