जनतेच्या कर्फ्यूमध्ये कराड शंभर टक्के सहभागी...दोन मयत व्यक्तींचे नातेवाईकांच्या उपस्थितीत दहन


जनतेच्या कर्फ्यूमध्ये कराड शंभर टक्के सहभागी...दोन मयत व्यक्तींचे नातेवाईकांच्या उपस्थितीत दहन


कराड - कराड शहरासह संपूर्ण तालुक्यात आज 100% बंद पाळण्यात आला. कराड शहरात सर्वत्र शुकशुकाट होते. सकाळी दशक्रिया विधी एकाची नातेवाईकांच्या उपस्थितीत झाले. दरम्यान कराडमधील दोन व्यक्ती मयत झाल्यामुळे सकाळी ९ व दुपारी ४ वाजता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दहन करण्यात आले.


जनता कर्फ्यू तंतोतंत पालन करण्यात आले. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी रात्री दहानंतर शहरातील साफसफाई केली होती. पोलीस खात्याचे अधिकारी व कर्मचारी सर्वत्र फिरवून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांची पथके तयार असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये घ्यावयाची काळजी व उपाय योजना तयार करण्यात आले आहेत.अपवादात्मक काही व्यक्ती बाहेरून आल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली जात होती. कशासाठी ? शहरांमध्ये आलेत याबाबत माहिती घेऊन त्यांना सदर घटनेचे गांभीर्य सांगून परत पाठवले जात होते.दरम्यान ५ वाजता नागरिकांनी घराबाहेर व गलरीत येवून घंटानादद, थाळीनाद, टाळ्यांचा निनाद केला.लहान मुले "कोरोना गो"करीत होते. पाच मिनिटांसाठी घराबाहेर आलेल्या लोकांना पुन्हा पोलिसांनी आवाहन करून घरांमध्ये परत पाठवले. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दिवसभर एक वाहनही दिसत नव्हते.



दरम्यान सहकार मंत्री बाळासाहेब पाटील कराड येथील निवासस्थानी तर राज्यमंत्री शंभूराज देसाई सातारे येथील निवासस्थानी पेंटिंग कामाचा निपटारा केला. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून परिस्थितीबाबत माहिती घेत होते.राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत दोन्ही मंत्रीमहोदय वारंवार सूचना करीत होते.कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी होणारे नियमित लसीकरण सत्र रद्द करण्यात आले आहे.



कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी रविवारी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत सातार्‍याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनीही वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला होता. दिवसभर निवासस्थानी राहत वाचन व इतर कामे करून त्यांनी कुंटुबियां समवेत आपला वेळ घालविला.


‘स्वतःसहित कुटुंबातील सर्वांच्या तब्येतीची काळजी घ्या. घराबाहेर पडू नका’ असे आवाहन यानिमित्ताने खासदार पाटील यांनी नागरिकांना केले आहे. तसेच काळजी घ्यायची पक्के ठरवू! आपण कोरोनाला नक्की हरवू! असे म्हणत खासदार पाटील यांनी जनतेला स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सारंग पाटील यांनीही वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडत आपल्या मुलांसोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला.



आम्ही पोलीस सदैव आपल्यासाठी रस्त्यावर आहे. आपण स्वतः साठी, आपल्या कुटुंबासाठी घरी रहा. अलिप्त रहा, गर्दी टाळा. विनाकारण बाहेर पडू नका, संपर्क टाळणे हा फार मोठा उपचार आहे..मला काहीही होणार नाही.कोरोना मला काय करतोय.हे काही दिवस आपल्या डोक्यातून काढून टाकावे. वैद्यकीय तज्ज्ञ लोकांचा सल्ला आपण पाळावा.व इतरांनाही पालन करण्यास भाग पाडावे.. काळजी घेण्यास स्वतः पासून सुरुवात करून इतरांचे संरक्षण करावे असे आवाहन पोलीस उपाधीक्षक सुरज गुरव यांनी केले आहे.



शिवसैनिक वैभव शिंदेंच्या पोस्टची दखल


शिवसैनिक वैभव शिंदे हे सध्या पोलंड येथे आहेत. ते मूळचे वनसगाव येथील असून त्यांनी कोरोना आजारासंबंधी सांगितलेल्या अनुभवाची पोस्ट कराडमध्ये सोशल मीडियावर चांगलीच प्रसारित होत असून दक्षता घेण्याबाबत केलेल्या आवाहनाची गांभीर्याने लोक दखल घेत आहेत.