सय्यद इनामदार यांचा पुरस्काराने गौरव
कराड - कराड वार्ताच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारामध्ये कराड येथील सय्यद बादशहा इनामदार यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. आदर्श सेतु कर्मचारी आणि सुंदर हस्ताक्षर याबद्दल सय्यद इनामदार यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
सय्यद इनामदार हे कराड येथील तहसीलदार कार्यालयात असणाऱ्या सेतुमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात.सय्यद इनामदार यांचे सुंदर हस्ताक्षर असून कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना ते सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर काम करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असल्यामुळे या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती.
कराडचे परिवहन अधिकारी संतोष काटकर यांच्या हस्ते सय्यद इनामदार यांना पुरस्कार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार सुभाष देशमुख, नायब तहसीलदार तांबे, मनसेचे दादा शिंगण, अरविंद पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.