जिल्हाधिकार्‍यांचा आदेश केराच्या टोपलीत  कराड शिक्षण महोत्सव चौकशीची मागणी

जिल्हाधिकार्‍यांचा आदेश केराच्या टोपलीत 
कराड शिक्षण महोत्सव चौकशीची मागणी


कराड - सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी गर्दी करणारे सर्व शासकीय व खासगी कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले. मात्र कराड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाला केराची टोपली दाखवीत जल्लोषात व गर्दी जमवून चार दिवसांच्या शिक्षण महोत्सव साजरा केला. कोरोची धास्ती आत्या जागा ने घेतलेली असताना कराडमध्ये मात्र शिक्षकांनी जिल्हाधिकार्‍यांचा आदेश सपशेल धुडकावून लावला. कराड शिक्षण महोत्सवाची चौकशी करण्यात यावी अशी आता मागणी होऊ लागली आहे.


गत पंधरा दिवसात देशातील विविध भागात करोनाचे रूग्ण आढळले. रूग्णांच्या संख्येत वाढ होत असून यांनीही होळीचा सण, उत्सव आणि गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. पुण्यातही करोनाचे रूग्ण आढळल्याने घबराटीचे वातावरण आहे. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी गर्दी करणारे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन केले होते. मात्र जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन कराड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने धुडकावून लावले. आणि गर्दी जमून दिमाखात शिक्षण विभागाने चार दिवसांचा शिक्षण महोत्सव साजरा केला.


दरम्यान विद्यार्थ्या, पालक, शिक्षक यांना शिक्षण महोत्सवासाठी हजेरी लावण्याचे फर्मान काढले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोण कुठून आला असेल ? याची खात्रीजमा झाली नाही. अशा परिस्थितीत शिक्षण विभागाने जिल्हाधिकार्‍यांचा आदेश डावलला आणि महोत्सवाच्या नावाखाली मिरवणार्‍यांनी आपली हौस पुरी करून घेतली. कराड शिक्षण महोत्सवाची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पोलंड येथे राहणाऱ्या आपल्या राज्यातील वनसगांवचे वैभव शिंदे यांनी लिहीलेली ही पोस्ट... मुद्दाम आपणा सर्वांसाठी वाचा आणि सगळ्यांना सांगा.... जीवन सुंदर आहे दक्षता घेऊ या...!
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह
Image
48 तासात बँकेत जमा झाली रक्कम.....शेतकऱ्यांना चैतन्य देणारी कर्जमुक्ती