"सह्याद्री" कार्यस्थळावर सायरन -टाळ्या - घंटानाद करून आभार
कराड - जगभर थैमान घालेल्या कोरोना विषाणूची व्याप्ती देशात होऊ लागली आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जनता कर्फ्युस प्रतिसाद देत सह्याद्रि सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कर्फ्युचे पालन करण्यात आले.
या संकटाच्या काळामध्ये कोरोना विष्णूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरामध्ये अहोरात्र प्रयत्न करत असलेले आरोग्य विभागाचे कर्मचारी, सरकारी कर्मचारी, पोलीस बांधव व इतर क्षेत्रातील कर्मचारी यांचे कारखाना कार्यस्थळावर सायरन वाजवुन, टाळ्या वाजवून तसेच घंटानाद करून आभार मानन्यात आले.
याप्रसंगी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक, कराड उत्तरचे युवा नेते जशराज पाटील(बाबा), कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, फायनांन्सियल अडवायझर एच.टी. देसाई, शेती अधिकारी मोहनराव पाटील, पर्यावरण इंजिनिअर एच.जे.माने, उपऊसविकास अधिकारी एस.जी.चव्हाण तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.