जीवनावश्यक वस्तू पुरवठ्याबाबतच्या समस्यांसाठी मदत कक्ष;अडचण असल्यास संपर्क साधा : मंत्री छगन भुजबळ


जीवनावश्यक वस्तू पुरवठ्याबाबतच्या समस्यांसाठी मदत कक्ष;अडचण असल्यास संपर्क साधा : मंत्री छगन भुजबळ


मुंबई : 'कोव्हीड-19' आजारासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान नागरीकांना रेशन दुकानावर साहित्य न मिळणे, बाजारात वाढीव दराने वस्तूंची विक्री होणे तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत राज्यभरातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयामार्फत मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.


जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत तसेच इतर कोणत्याही स्वरुपाच्या समस्या भेडसावत असल्यास नागरीकांना सहाय्य मिळवून देण्यासाठी मंत्री कार्यालय सदैव तत्पर आहे.


तक्रारदारांनी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


श्री.संतोषसिंग परदेशी-खाजगी सचिव-9870336560, श्री.अनिल सोनवणे-विशेष कार्य अधिकारी-9766158111, श्री.महेंद्र पवार- विशेष कार्य अधिकारी-7588052003, श्री.महेश पैठणकर-स्वीय सहाय्यक-7875280965.


        मंत्री कार्यालयामार्फत अशी सुविधा प्रथमच सुरू झाली असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही सुविधा राबविण्यात येत असल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


Popular posts
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतला कोल्हापुर परिक्षेत्रातील.....विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयातील पोलीस अधीक्षकांचा आढावा.
Image
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले पतसंस्थेचे नव्या वास्तूत स्थलांतर
Image
अंत्योदय व केसरी (प्राधान्य कुटुंब लाभार्थी ) कार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप सुरू : तहसीलदार अमरदीप वाकडे 
Image
कराड नगरपालिका व महिला व बालकल्याण समिती..... महिला सक्षमीकरण सकारात्मक चांगले काम
Image
मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी.....सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश