तीन मंत्र्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम रद्द : माणिकराव पाटील


तीन मंत्र्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम रद्द : माणिकराव पाटील


कराड - घोणशी (ता.कराड) येथे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कोरोना वायरच्या कारणास्तव रद्द करण्यात आल्याची माहिती माणिकराव पाटील यांनी दिली.


सद्या जगभर थैमान घातल असलेल्या कोरोना विषाणूचा प्रसार भारतात आणि महाराष्ट्रातही कांही प्रमाणात होवू लागला आहे. त्याबाबत दक्षता म्हणून मुख्यमंत्री व आरोग्य मंत्रालय महाराष्ट्र शासन यांनी सार्वजनिक ठिकाणी होणारे राजकीय, सामाजिक कार्यक्रम, यात्रा, उरूस, शाळा कॉलेजमधील कार्यक्रम, लग्न समारंभ आदि गर्दीचे कार्यक्रम पुढील आदेश येईपर्यंत आयोजित करू नयेत अशाप्रकारे केलेल्या आवाहनानुसार व घोणशी (ता.कराड) येथे रविवार 22 मार्च, 2020 रोजी नामदार बाळासाहेब पाटील, नामदार शंभुराज देसाई, नामदार विश्वजित कदम आणि सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक यांचा सत्कार नामदार रामराजे नाईक निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या शुभहस्ते आणि सातारा व सांगली जिल्ह्यातील आजी माजी आमदार, आजी माजी जि.प.सदस्य व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित केलेला सत्कार समारंभ रद्द करण्यात आलेला असल्याची माहिती सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक माणिकराव पाटील, आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब सहकारी बँकेचे संचालक संभाजी पिसाळ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे उपाध्यक्ष संजय पिसाळ, आनंदराव पिसाळ गुरूजी, उदय पाटील, अनिल पाटील, रामचंद्र पिसाळ व ग्रामस्थ यांनी दिली.