अथर्व देसाईला राज्य क्रीडा पुरस्कार....हिंदकेसरी दिनानाथ सिंह यांच्या हस्ते प्रदान


अथर्व देसाईला राज्य क्रीडा पुरस्कार....हिंदकेसरी दिनानाथ सिंह यांच्या हस्ते प्रदान


कराड - आणे (ता. कराड) येथील अथर्व सुहास देसाई या उदयोन्मुख खेळाडूला स्केटींग क्षेत्रातील चमकदार कामगिरीबद्दल मास्टर चंदगीराम राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर येथे आयोजित राज्यस्तरीय क्रीडा अधिवेशनात हिंदकेसरी पैलवान दिनानाथ सिंह आणि आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपट्टू संग्राम चौगुले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


संपूर्ण देशभर कार्यक्षेत्र असलेल्या क्रीडा विकास परिषदेच्यावतीने दरवर्षी क्रीडा अधिवेशनाचे आयोजन केले जाते. या अधिवेशनात विविध क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करणार्‍या उदयोन्मुख खेळाडूंना रूस्तम-ए-हिंद, पद्मश्री पैलवान मास्टर चंदगीराम यांच्या नावे पुरस्कार प्रदान केला जातो. स्केटींग क्षेत्रात चमकदार कामगिरी केल्याबद्दल आणे (ता. कराड) येथील अथर्व सुहास देसाई याला या राज्य क्रीडा पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.


कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कृष्णा स्कूलच्या सी.बी.एस.ई. विभागात इयत्ता पाचवीत शिक्षण घेणार्‍या अर्थर्वने आत्तापर्यंत अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्केटींग स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. कोल्हापूरातील जे. जे. रोलर स्केंटींग अकॅडमीचे प्रशिक्षक जयराम जाधव आणि योगेश स्केटींग अकॅडमीचे प्रशिक्षक योगेश लोंढे यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले, मुख्याध्यापिका स्नेहल निकुंब यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.


Popular posts
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
सातारा जिल्ह्यातील नागरिकांचा लॉकडॉऊनला चांगला प्रतिसाद : पालकमंत्री बाळासाहेब पाटील 
Image
जिल्हा परिषद पाझर तलावांची ठेका रक्कम कमी करावी..... सातारा जिल्हा मत्स्यव्यवसाय संघाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन  
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
नगरपालिकेच्या सभेत नगरसेवकांनी प्रशासन व मुख्याधिकार्‍यांना धरले धारेवर...विषयपत्रिकेवरील 90 विषय मंजूर; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा नागरी सत्कार होणार
Image