‘‘व्वा...!, खूपच सुंदर...!’’ अभिनेते मकरंद देशपांडे यांचे गौरवोद्गार


‘‘व्वा...!, खूपच सुंदर...!’’
अभिनेते मकरंद देशपांडे यांचे गौरवोद्गार

कराड - व्वा वा ..!, खूपच सुंदर..!’’ अशा शब्दात सुप्रसिध्द अभिनेते मकरंद देशपांडे यांनी पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील युवा चित्रकार संदीप डाकवे यांनी दिलेल्या अक्षरगणेशाचे कौतुक केले. दादर येथे शिवाजी मंदीरामध्ये ‘सर, प्रेमाचं काय करायचं’ या नाटकाच्या सेटवर संदीप डाकवे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी चित्रकार संदीप डाकवे यांचे दिलखुलास कौतुक केले. संदीप डाकवे यांनी सुमारे 3000 च्या वरती विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती, सेलिब्रिटी यांना शब्दचित्र, अक्षरगणेशा, रेखाचित्रे दिली आहेत. त्यांच्या या उपक्रमाची दखल इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड या पुस्तकात दोनदा झाली आहे.रेखाचित्र भेट देणे या छंदाबरोबरच संदीप डाकवे यांनी व्यंगचित्रे, बोलक्या भिंती रेखाटन, छत्रीवर व्यसनमुक्ती संदेश, खडूवर अष्टविनायक, कॅलिग्राफी, इ.ही समाजोपयोगी छंद जपले आहेत. अभिनेते मकरंद देशपांडे यांच्यासोबत अभिनेत्री आकांक्षा गाडे, माधुरी गवळी, अजय कांबळे, निनाद लिमये, अनिकेत भोईर या सहकलाकारांनाही संदीप डाकवे यांनी अक्षरगणेशा भेट दिला.


प्रयोगानंतर मिळालेल्या या अनोख्या ‘गिफ्ट’ मुळे सर्वजण खुश झाले. त्यांनी संदीप डाकवे यांना धन्यवाद दिले. संदीप डाकवे यांनी रेखाटलेल्या अक्षरगणेशा ची चर्चा उपस्थितींत बराच काळ होती.
यावेळी चित्रकार संदीप डाकवे यांच्यासमवेत शिवाजी शिर्के, विजय मोहिते, प्रफुल्ल कचरे व इतर उपस्थित होते. कलेतून सामाजिक बांधिलकी जपत संदीप डाकवे यांनी आतापर्यंत स्पंदन ट्रस्ट च्या माध्यमातून गरजूंना लाखो रुपयाची रोख रक्कम, शैक्षणिक साहित्य, पुरग्रस्तांना मदत, गणवेश वाटप केले आहे. कलेचा उपयोग समाजासाठीही करता येवू शकतो हे यावरुन दिसून येतो. संदीप डाकवेच्या संवदेनशील मनाचे दर्शन यातून होते.


Popular posts
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image