महिला सबलीकरण काळाची गरज - डॉ.अंजली देशपांडे महिलांकरीता जनकल्याणच्या सवलतीच्या व्याजदरात कर्ज योजना


महिला सबलीकरण काळाची गरज - डॉ.अंजली देशपांडे
महिलांकरीता जनकल्याणच्या सवलतीच्या व्याजदरात कर्ज योजना


कराड - स्त्रि ही विश्वबंधुत्वाचे धडे देणारी आहे. कमाविण्याचा अधिकार असणाऱ्या स्त्रिला खर्च करण्याचा अधिकार मात्र अजूनही पूर्णपणे नाही. स्त्रि ही शारिरिक, मानसिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम पाहिजे. मात्र सध्या स्त्रियांच्या बाह्य रुपालाच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे स्त्रियांनीच स्वतःहून स्वत्व शोधले पाहिजे व त्याचा विकास केला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.अंजली देशपांडे यांनी केले.


कराडच्या जनकल्याण पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महिला मेळावा आयोजित केला होता. यावेळी डॉ.अंजली देशपांडे यांनी स्त्रियांचे सबलीकरण हा विषय विस्तृतपणे मांडला. सदर मेळावा संस्थेच्या सभासद, महिला ग्राहकांसाठी सौ.वेणूताई चव्हाण स्मारक येथे आयोजित केला होता. प्रमुख पाहुण्या म्हणून पुण्याच्या दृष्टी स्त्रि अध्ययन प्रबोधन केंद्राच्या संस्थापक सचिव डॉ.अंजली देशपांडे उपस्थित होत्या. उद्घाटन दीपप्रज्वलनाने चंद्रशेखर देशपांडे झाला. डॉ.मिलींद पेंढारकर, डॉ.सुचिता हुद्देदार, वर्षा कुलकर्णी, पूनम वास्के उपस्थित होते.


महिला ग्राहकांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी जनकल्याण पतसंस्थेने महिला ग्राहकांसाठी दुचाकी, चारचाकी वाहन व घर खरेदी करीता सवलतीच्या व्याजदरात कर्जयोजना जाहीर केल्या. त्याचा अधिकाधिक फायदा महिला ग्राहकांनी करून घ्यावा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले.


डॉ.सौ.सुचिता हुद्देदार यांनी संस्थेच्या मागील २४ वर्षांचा आढावा घेतला. पूनम वास्के यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर आभार प्रदर्शन वर्षा कुलकर्णी यांनी केले.