कराड शहरातील वैद्यकीय सुविधा परिपूर्ण...१०० बेड,११२ हॉस्पिटल,६८ व्हेंटिलेटर, ICU ची एकूण १६९ बेडची सुविधा 

कराड शहरातील वैद्यकीय सुविधा परिपूर्ण...१०० बेड,११२ हॉस्पिटल,६८ व्हेंटिलेटर, ICU ची एकूण १६९ बेडची सुविधा 


कराड - कराड शहरात असलेले सुसज्ज सौ.वेणूताई उपजिल्हा रुग्णालयात १०० बेडची उपलब्धता असून डॉक्टर्स आणि स्टाफ यांची संख्या पूरक आहे. कोरोना संसर्गजन्य रुग्णांकरिता खास ८ बेडचा विशेष कक्ष केलेला आहे. तसेच ज्या हॉस्पिटलमध्ये पेशंट अॅडमिट करायची व्यवस्था आहे. असे ११२ खाजगी हॉस्पिटल आहेत. त्यापैकी १० हॉस्पिटलमध्ये ICU ची एकूण १६९ बेडची सुविधा आहे आणि महत्वाचे म्हणजे कराडमध्ये फक्त ६८ व्हेंटिलेटर सुविधा आहे अशी अधिकृत माहिती सौ.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. प्रकाश शिंदे यांनी दिली आहे.


कोरोना वायरससी आता सर्व जग झुंज देत आहे. कराड शहरामध्ये असलेल्या वैद्यकीय सुविधेबाबत प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने विचारल्यानंतर डॉक्टर प्रकाश शिंदे यांनी माहिती दिली आहे. कोरोनाबाबत कराडमधील वैद्यकीय कामांचा आढावा घेतला असून कोरोना संसर्गजन्य रुग्ण सापडले तर त्यांच्यावर उपचार करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या गेल्या आहेत. अत्यावश्यक सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयातही व्यवस्था करण्यात आली आहे. कराड आणि परिसरातील लोकांनी शासकीय आदेशाचे पालन करुन स्वतःचे व इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. महत्त्वाचे आणि गरजेचे असेल तर घराबाहेर पडा अन्यथा बाहेर पडू नका घरीच रहा वारंवार हात साफ करा. गर्भवती, वृध्द आणि लहान मुलांची विशेष काळजी व खबरदारी घ्या, हीच कृती कोरोनावर मात देईल.