कुक्कुट उत्पादनांमुळे कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव होत असल्याची अफवा पसरविणाऱ्यांवर पोलीसांकडून कारवाई - पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार

कुक्कुट उत्पादनांमुळे कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव होत असल्याची अफवा पसरविणाऱ्यांवर पोलीसांकडून कारवाई - पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार


मुंबई : कुक्कुट उत्पादनाद्वारे कोरोना विषाणू मानवी आरोग्यास धोका पोहोचवु शकतो ही बाब पूर्णतः अशास्त्रीय व निराधार असून अशा अफवांवर विश्वास ठेवू नये,  मोबाईलवर अशा अफवा पसरविणाऱ्यांवर गंभीर कारवाई करण्यात येत असून अशा अफवाविषयी नागरिकांनी दक्ष रहावे असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी केले आहे.


श्री. केदार म्हणाले, कोरोना विषाणू  प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सोशल मीडिया उदा. फेसबुक, व्हॉट्सॲपवर, युट्युबवर कुक्कुट मांस व इतर उत्पादने यांच्या आहारातील समावेशाबाबत विविध अशास्त्रीय बाबी पसरवल्या जात आहेत. अशा अफवांमुळे कुक्‍कुट खाद्य निर्मिती व कुक्कुट पालनावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. या उत्पादनाद्वारे कोरोना विषाणू मानवी आरोग्यास धोका पोहोचू शकतो हे पूर्णतः अशास्त्रीय व निराधार आहे, असे  त्यांनी सांगितले.


चिकन अंडी खाल्ल्याने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होतो, अशी व्हिडिओद्वारे खोटी माहिती व अफवा पसरविणाऱ्यांची गांभीर्याने दखल घेत सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. एकाला आंध्रप्रदेशातून तर दुसऱ्याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले आहे. अफवा पसविणाऱ्यांचा शोध सुरु असून त्यांच्यावरही गंभीर कारवाई करण्यात येणार आहे.  पोलिसांच्या कारवाईमुळे पोल्ट्री व्यवसाया करणाऱ्या शेतकऱ्यांना  दिलासा मिळाला आहे, असे श्री.केदार यांनी सांगितले.


Popular posts
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image