कोरोनाबाबत सुरक्षेसंबंधी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचना


कोरोनाबाबत सुरक्षेसंबंधी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचना


कराड - कोरोनाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासंबंधी व घेतल्या जाणाऱ्या सुरक्षीततेसंबंधी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशा सूचना सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले.


कराड येथील शासकीय विश्राम घरांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांवर आढावा बैठक घेण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढु नये म्हणून मोठ्या समारंभाचे आयोजन करू नये असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासंबंधी घेण्यात येणाऱ्या खबरदारीबाबत कराड येथे सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.


याप्रसंगी प्रांताधिकारी उत्तम दिघे, उपविभागीय पोलीस अधीक्षक सुरज गुरव, तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्याअधिकारी यशवंत डांगे, पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, उपजिल्हाधिकारी सोपान ठोनपे,  किशोर धुमाळ, वाहतूक निरीक्षक सतीश बडवे, पी.एस.आय.शिरोळे, डॉ.संजय शिंदे, डॉ.राजेश गायकवाड, संजिवनी दळवी, तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीमती देशमुख, गटविकास आधिकरी आबासाहेब पवार व इतर अधिकारी उपस्थित होते.