शिवसुर्य
सातारा आणि जावली तालुक्यांच्या सर्वांगिण विकासासह अजिंक्य उद्योग समुहाला उभारी देण्याचे शिवधनुष्य पेलणार्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या अष्टपैलू कामगिरीने राजकारणात एक आदर्श घालून दिला आहे. राजघराण्याचा समाजसेवेचा वारसा अविरतपणे पुढे चालवणार्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा आणि जावली तालुक्यात विकासगंगा कायम प्रवाहित ठेवून मतदारसंघाचा सर्वांगिण विकास साध्य केला आहे. अनेक सहकारी संस्थांना उर्जितावस्था देत अजिंक्य उद्योग समुहाला सहकाराच्या उच्च शिखरावर विराजमान करुन हजारो हातांना काम आणि तालुक्यातील शेतकर्यांना हक्काचे दाम मिळवून देऊन आ. शिवेंद्रसिंहराजेंनी स्व. अभयसिंहराजे भोसले यांचा समाजसेवेचा वारसा अखंडीत ठेवला आहे. विकासकामात राजकारण न आणता, पक्षीय भेदभावास थारा न देता, प्रत्येकाचे प्रश्न सोडवणार्या, मतदारसंघाचा विकास हाच आमचा ध्यास, हे बि‘द सत्यात उतरवून एक आदर्श समाजकारणी कसा असावा, याचे मुर्तीमंत उदाहरण बनलेल्या, सर्वसामान्यांच्या या नेतृत्वाने राज्याच्या राजकीय पटलावर एक वेगळा ठसा उमठवला आहे. केवळ राज्यातच नव्हे तर देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आदर्श बँक अशी ‘याती असलेल्या सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आपल्या कार्यकतृत्वाच्या जोरावर बँकेच्या नावलौकिकातही भर टाकली. सत्तेपेक्षा मतदारसंघाचा विकास केंद्रबिंदू मानून अखंड कार्यरत राहणारे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणजे समाजकारणाच्या क्षितिजावर तळपणारा शिवसुर्य होय!
१९७८ मध्ये आ. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले तथा स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या रुपाने सातारा तालुक्याला प्रभावी नेतृत्व लाभले आणि वाई अथवा कराड मतदारसंघावर अवलंबून राहणार्या सातारा तालुक्याला विकासाची एक वेगळी दिशा मिळाली. स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या परिसस्पर्शाने सातारा तालुक्याचे खर्या अर्थाने सोने झाले. आमदार ते सहकारमंत्री अशी अनेक पदे भूषविणार्या भाऊसाहेब महाराजांनी पदांना साजेशे काम करुन सातारा तालुक्याचा चेहरामोहरा बदलून जिल्ह्याच्या राजकारणात सातारा तालुक्याला महत्वाचे स्थान निर्माण करुन दिले. भाऊसाहेब महाराजांच्या अकाली निधनानंतर तालुका आपल्या भाग्यविधात्या नेतृत्वाला पारखा झाला. स्व. भाऊसाहेब महाराजांनंतर सातारा तालुक्यात सुरु झालेली विकासाची गंगा अविरत सुरु ठेवण्याची जबाबदारी त्यांचे सुपुत्र आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर आली. समाजकारणाचे बाळकडू मिळालेल्या बाबाराजेंनी लहान वयात ही जबाबदारी समर्थपणे पेलली आणि तालुक्याच्या राजकारण, समाजकारण आणि सहकार क्षेत्रात अलौकिक कर्तुत्वाने एक आदर्श निर्माण केला. भाऊसाहेब महाराजांच्या काळातील जुन्या, जेष्ठ कार्यकर्त्यांच्यासोबत नव्या पिढीतील युवा कार्यकर्त्यांची सांगड घालून त्यांनी सातारा विधानसभा मतदारसंघात विकासाचा झंजावात सुरु केला. अल्पावधीतच आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपले नाव कोरले. स्व. भाऊसाहेब महाराजांची उणीव आ. शिवेंद्रसिंहराजेंनी भरुन काढली आणि सातारा तालुक्याला नवी दिशा देण्याचे काम केले आहे. दांडगा जनसंपर्क, प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे, रात्री, अपरात्री, कोत्याही प्रसंगी जनतेसाठी उपलब्ध असणारे, विनयशिल, संयमी, स्पष्टवक्ते, विकसनशील नेतृत्व. राजकारणाला समाजकारणाची जोड देणारे कृतीशिल नेतृत्व आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या रुपाने सातारा- जावली मतदारसंघाला लाभले आहे.
कृषी- औद्योगिक- शैक्षणिक क‘ांती
स्व. अभयसिंहराजे भोसले यांनी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून विकासगंगेचा उगम करुन सातारा तालुक्यात कृषी- औद्योगिक विकासाला चालना दिली. अजिंक्य उद्योग समुहाच्या माध्यमातून स्व. भाऊसाहेब महाराज यांनी सातारा तालुक्यातील बेरोजगारीला लगाम घालण्याचे काम केले. त्यांच्या पश्चात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अजिंक्य उद्योग समुहाला सहकाराच्या उंच शिखरावर नेवून ठेवले आहे. केवळ साखर निर्मीतीवरच अवलंबून न राहता साखर कारखान्यात इथेनॉल प्रकल्प, सहवीज निर्मीती प्रकल्प असे मुल्यावर्धित प्रकल्प सुरु करुन साखर उद्योगाला खर्या अर्थाने उर्जीतावस्था प्राप्त करुन दिली. अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीत प्रत्यक्ष सूत उत्पादास प्रारंभ करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्व. भाऊसाहेब महाराज आणि सातारा तालुक्याचे स्वप्न पुर्णत्वास नेले. सूत गिरणीच्या माध्यमातून तालुक्यातील शेकडो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला असून प्रत्येक हाताला काम देण्याचे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न खर्या अर्थाने सत्यात उतरले आहे.
कारखाना कार्यस्थळावर सुरु करण्यात आलेल्या अभयसिंहराजे भोसले इन्स्टिट्यूट ऑङ्ग टेक्नॉलॉजी या अभियांत्रीकी महाविद्यालयामुळे तालुक्यासह जिल्हाभरातील गोरगरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली झाली. मुलींना मोङ्गत शिक्षण देणार्या या महाविद्यालयाने असं‘य गुणवत्ताधारक विद्यार्थी दिले आहेत. अजिंक्यतारा सहकारी ङ्गळे, ङ्गुले व भाजीपाला खरेदी- विक‘ी संस्थेच्या माध्यमातून सातारा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकर्यांच्या मालाला दर्जा आणि रास्त भाव मिळवून दिला जातो. शेतकर्यांचा माल अधिक दर्जेदार असावा, त्याला चांगला भाव मिळावा म्हणून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून संस्थेच्या कोल्ड स्टोरेज युनीटची उभारणी झाली. जिल्ह्यातील शेतकर्यांना आधूनिक शेतीची ओळख होण्यासाठी ङ्गळे, ङ्गुले संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरीय ‘याती प्राप्त निसर्ग कृषी प्रदर्शनात दरवर्षी शेतकर्यांची जत्रा भरते आणि या आधुनिक कृषी प्रदर्शनात जिल्हाभरातील शेतकर्यांना आपण शेतकरी असल्याचा अभिमान वाटतो. शेतकर्यांचा माल थेट ग‘ाहकापर्यंत पोहचविण्यासाठी गहू- ज्वारी, तांदूळ महोत्सव राबवले जात असून आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामुळे सातारा तालुक्यात कृषी- औद्योगिक आणि शैक्षणिक क‘ांती घडली आहे.
जल, सिंचनक‘ांती ...
स्व. अभयसिंहराजे भोसले यांनी सातारा तालुका सुजलाम सुङ्गलाम व्हावा, हे स्वप्न उराशी बाळगून उरमोडी धरणाची उभारणी केली. आज धरण मोठ्या दिमाखाने उभे असून या धरणातील पाणी कालव्यांद्वारे तालुक्याच्या कानाकोपर्यात पोहचले आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन उरमोडी धरणाचे पाणी शेतकर्याच्या शेतात पोहचवून स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साकार केले आहे. सातारा आणि जावली तालुक्यात असं‘य बंधारे उभारुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदारसंघात जलक‘ांती घडवून आणली आहे. जावली सार‘या दुर्गम, डोंगराळ भागात ठिकठिकाणी बांधलेल्या बंधार्यांमुळे परिसरातील पाणी टंचाई कायमची दूर झाली आहे. सातारा तालुक्यातही अनेक ठिकाणी बंधारे बांधले असून या बंधार्यांमुळे हजारो हेक्टर जमिनीला बारमाही पाणी उपलब्ध झाले आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचा शेतीसाठी नियोजनबध्द वापर होत असल्याने सातारा- जावली मतदारसंघ खर्या अर्थाने सुजलाम सुङ्गलाम झाला आहे. जावली तालुक्यातील ५४ गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून बहुचर्चीत आणि महत्वकांक्षी बोंडारवाडी प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यातून हे धरण लवकरच पुर्ण होणार आहे.
पाणीप्रश्न सोडवण्यास प्राधान्य
सातारा शहरासह सातारा आणि जावली तालुक्यातील प्रत्येक गाव पिण्याच्या पाण्यासाठी स्वयंपुर्ण व्हावे, हे ध्येय ठेवून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मतदारसंघातील पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यास प्राधान्य दिले आहे. पुढील ५० वर्षांचा विचार करुन सातारा शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी त्यांनी कास धरणाची उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळवून दिली. कास धरणाच्या उंची वाढविण्याच्या प्रत्यक्ष सुरुवात झाली असून आता निधी अभावी या प्रकल्पाचे काम रखडू नये, यासाठीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पाठपुरावा करुन या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असून या महत्वकांक्षी योजनेमुळे सातारा शहरासह आजूबाजूच्या १५ ते २० गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. सातारा शहरालगत असलेल्या शाहुपूरी ग‘ामपंचायतीला भेडसावणारा पाणीप्रश्नही नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सोडवला आहे. शाहूपुरीसह दिव्यनगरी, कोंडवे, अंबेदरे, दरे बु. आदी गावात स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्या आहेत. जावली तालुक्यातही याचपध्दतीने प्रत्येक गावात स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून होत आहे.
पर्यटनाला चालना
सातारा शहर आणि परिसराला समृध्द असा ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा लाभला आहे. मतदारसंघाचा सर्वांगिण विकास साधताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पर्यटनालाही चालना दिली आहे. सातारा शहरातील छत्रपती शिवाजी वास्तू संग‘हालयासाठी नवीन, सुसज्ज आणि देखणी इमारत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांमुळे मध्यवर्ती बस स्थानकाशेजारी उभी राहिली आहे. येत्या काही दिवसांतच या नवीन प्रशस्त वास्तूत शिवकालीन व ऐतिहासीक वस्तू स्थलांतरीत केल्या जाणार असून या प्रशस्त वास्तू संग‘हालयामुळे सातारा शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. अजिंक्यतारा किल्ल्याचा विकास, सुशोभिकरण आणि सुधारणा करणे यासाठी ३ कोटी २४ लाख रकमेच्या आराखड्यास, तसेच कास पठार जैवविविधता संवर्धन व संरक्षणासाठी ३ कोटी १० लाख रुपयांच्या आराखड्यास प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत पर्यटन विकास महामंडळाकडून मंजुरी घेवून आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. किल्ल्यावरील ऐतिहासिक तळ्यांचे पुनुरुजीवन करण्यासाठी ५० लाख तर कास पठाराच्या संवर्धनासाठी ८५ लाख रुपयांचा निधी मिळवला आहे. याशिवाय ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्याचा निश्चय आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केला असून आगामी काळात हा संकल्पही पुर्णत्वास जाणार आहे. जागतीक वारसा स्थळामध्ये स्थान मिळालेले कास पठार पाहण्यासाठी देश- परदेशातून पर्यटक हजेरी लावतात. कास पर्यटनवाढीच्या दृष्टीने आ. शिवेंद्रसिंहराजेंनी बोगदा ते अनावळे या रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम मार्गी लावले आहे तर कास, बामणोली भागातील १२ दुर्गम गावातील पोच रस्त्यांच्या कामासाठीही भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे. नैसर्गिक संपत्तीने नटलेल्या जावली तालुक्यातही पर्यटनवाढीसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रस्ताव तयार करुन त्यांच्या मंजूरीसाठी पाठपुरावा सुरु केला आहे. कुसुंबी पर्यटनस्थळाला जोडणारे रस्ते, संपुर्ण मेढा भाग कास बामणोलीला जोडणारा रस्ता, कास बामणोली ते महाबळेश्वर रस्ता असे महत्वपुर्ण रस्ते तयार करुन दळणवळणाची उत्तम सोय करुन पर्यटकांचा वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी महत्वपुर्ण पावले त्यांनी उचलली आहेत. ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनस्थळ असलेल्या सज्जनगडावर जाण्यासाठी परळी येथून रोप वे साठीही मंजूरी मिळवली आहे.
साहित्य, कला, क‘ीडा व संस्कृतीचे जतन
राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करत असताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी साहित्य, कला, क‘ीडा व सांस्कृतिक चळवळीलाही उभारी देण्याचे महान कार्य सातत्याने केले आहे. विविध क‘ीडा प्रकारात सातारा शहरासह जिल्हाभरातून खेळाडू तयार व्हावेत, यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शरिरसौष्ठव, भारोत्तोलन, कबड्डी, कि‘केट, बॉक्सिंग, बास्केट बॉल, ङ्गुटबॉल, हॉकी, ऍथलेटीक्स आदी क‘ीडा प्रकारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी नेहमीच आग‘ही भूमिका घेतली असून अशा क‘ीडा स्पर्धांना सातत्याने मदतीचा हात दिला आहे. स्वत: एक उत्तम धावपटू असलेल्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुंबई, गोवा, सातारा याठिकाणी झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन यश संपादन केले असून मॅरेथॉन मध्ये धावणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार अशी वेगळी ओळखही त्यांनी निर्माण केली आहे. मतिमंद खेळाडूंना आर्थिक मदत होण्याच्या उद्देशाने त्यांनी महाराष्ट्र राज्य डेङ्ग कि‘केट ङ्गेडरेशन विरुध्द मराठी सिनकलावंतांच्या प्रदर्शनीय क‘ीकेट सामान्याचे तसेच मेढा येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे नेटके आयोजन केले आहे. जिल्हा क‘ीडा संकुलात चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांच्या या पाठपुराव्यामुळेच आज जिल्हा क‘ीडा संकुलात बास्केट बॉल, बॅडमिंटन, स्विमिंग आदी खेळामध्ये खेळाडूंची सं‘या वाढत आहे. गेली अनेक वर्ष सातत्याने होत असलेल्या सातारा ङ्गेस्टीवलमुळे सांस्कृतिक चळवळ जोपासण्याचे कार्य आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हातून घडत आहे. साहित्यसंस्कृती वाढीसाठी सातार्यात होणारी साहित्य संमेलने, नाट्य संमेलने आदींसाठीही ते नेहमीच सहकार्याची भावना ठेवून साहित्य चळवळ वृध्दींगत करण्यासाठी प्रयत्न करत असतात.
गरजूंना मदतीचा हात
मतदारसंघात चौङ्गेर विकास साधताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी समाजकार्याचा अनोखा आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे. धरणग‘स्त, प्रकल्पग‘स्तांचे पुनर्वसन व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. जावली तालुक्यातील महु- हातगेघर प्रकल्पग‘स्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढला. प्रकल्पग‘स्तांचे पुनर्वसन तातडीने व्हावे आणि त्यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करुन जनतेला न्याय देण्याची भुमिका घेतली आहे. पवनचक्क्या, टोलनाके व औद्योगिक कंपन्या यामध्ये स्थानिक भुमिपुत्रांना प्राधान्य दिले जावे, यासाठी प्रसंगी आंदोलनाचे हत्यार उपसून भुमिपुत्रांना न्याय देण्याचा प्रयत्न आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केला आहे. नैसर्गिक आपत्तीग‘स्त, जळीतग‘स्त उघड्यावर पडलेल्या कुटूंबांना आर्थिक मदतीचा हात देऊन त्यांचा संसार सावरण्याचा प्रयत्नही त्यांनी अनेकदा केला आहे. याशिवाय विविध प्रकारच्या मोङ्गत आरोग्य तपासणी शिबिरांतून हजारो रुग्णांना जगण्याची नवी दिशा दिली गेली. जयपूर ङ्गूट शिबीराच्या माध्यमातून दिव्यांगांना मोङ्गत कृत्रीत हाप, पाय बसवले, हजारो दिव्यांगांना कुबड्या, तीनचाकी सायकल, व्हील चेअर देवून या बांधवांने जगणे सुसह्य करुन एक समाजसेवक कसा असावा, याचे मुर्तीमंत उदाहरण आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यारुपाने जिल्ह्याने पाहिले आहे.
सातारा शहराचा कायापालट
ऐतिहासिक सातारा शहराला आधुनिकतेकडे नेताना शहरातील सर्वच रस्त्यांचे रुंदीकरण आणि दर्जेदार डांबरीकरण करण्याचा सपाटा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातत्याने लावला आहे. राज्य शासन, केंद्र शासनासह नगरोत्थान, जिल्हा नियोजन समिती, अशा मिळेल त्या योजनेतून निधी उपलब्ध करुन देऊन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा शहरातील रस्ते चकचकीत केले आहेत. पोवई नाका येथे ग‘ेड सेपरेटरचे काम सुरु असून त्यामुळे शहराच्या मु‘य ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. मात्र ग‘ेड सेपरेटरचे काम तातडीने पुर्ण करावे तसेच काम पुर्णत्वास गेलेल्या मार्गावरील रस्ते दुुरुस्ती करुन वाहतूक सुरु करावी, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मागच्याच महिन्यात बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना केल्या होत्या. त्यांच्या सुचनेवरुनच पोवई नाक्यावर रस्त्यांचे काम युध्दपातळीवर सुरु असून काम पुर्ण झालेल्या मार्गावर वाहतूकही सुरु करण्यात आली त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. पोवई नाकाते विसावा नाका (कोरेगाव रोड) या रस्त्याचे चौपदरीकरण, विसावा नाका ते कृष्णानगर या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम मार्गी लागले आहे. मोळाचा ओढा- मध्यवर्ती बस स्थानक ते गोडोली नाका या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १९ कोटी ९० लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली असून या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. पोवई नाका, जिल्हा रुग्णालय ते जरंडेश्वर नाका या रस्त्याच्या रूंदीकरणाचेही काम युध्दपातळीवर सुरु आहे. सुसज्ज ङ्गिश मार्केट उभारणीसाठी दोन कोटी निधी उपलब्ध करुन दिला आहे. भाजी मंडईचे विस्तारीकरण, हॉकर्स झोन, पाकीर्र्ग झोन आदी अद्ययावत सोयी, सुविध उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले आहे.
सातारा- जावलीत विकासाचा झंजावात
सातारा आणि जावली तालुक्यातील प्रत्येक गावात कोट्यवधीची विकासकामे पुर्ण करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संपुर्ण मतदारसंघात विकासाचा झंजावात अखंड चालू ठेवला आहे. राजकीय गट- तट न पाहता विकासकामे केल्याने आ. शिवेंद्रसिंहराजे हे एक लोकाभिमुख नेतृत्व असल्याचे अधोरेखीत झाले आहे. दुर्गम आणि डोंगराळ जावलीच्या खोर्यातील खेड्यापाड्यांना आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामुळे सोन्याचे दिवस आले आहेत. कोट्यवधीची विकासकामे खेचून आणत आमदारांनी आपल्या कतृत्वाचा नारा जावलीच्या दर्याखोर्यात घुमवला आहे. मेढा पंचायत समितीची प्रशासकीय इमारत, न्यायालयाची सुसज्ज इमारत, पोलीस ठाण्याची इमारत, ग‘ामीण रुग्णालयांसाठी प्रशस्त इमारत व कर्मचारी निवासस्थान आदीसाठी कोट्यवधी रुपये निधी मिळवून देऊन ही सर्व कामे मार्गी लावली. मेढा ग‘ामिण पाणीपुरवठा योजनेसाठी एक कोटी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी १ कोटी ६९ लाखाचा निधी मिळवला. गेली ३० वर्ष रखडलेल्या कुसुंबी- कोळघर रस्त्यासाठी ९० लाखाचा निधी उपलब्ध करुन या रस्त्याचा प्रश्न महतप्रयासाने मार्गी लावला. वेण्णा नदीवरील भामघर पुलासाठी ६० लाख, खर्शी बारामुरे रस्त्यावरील मोठ्या पुलासाठी ४० लाख, पावगणी कुडाळ रस्ता व महू गावाजवळच्या पुलासाठी दोन कोटी ६० लाखण एकीव ते दुंद रस्त्यासाठी १ कोटी ४० लाख निधी मिळवून दिला तर याच रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ३ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. बोंडारवाडी धरण, महू- हातगेघर रिंगरोडचे काम आणि या धरणाच्या प्रलंबीत कामांना चालना दिली. कोयना पुर्नवसीत गावांना नागरी सोयी- सुविधा मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मेढा ते सातारा रस्त्यासाठी २५ लाख, आलेवाडी खिंड पदमलेमुरा, रेंगडीमुरा धनगर पेढा रस्त्याच्या कामासाठी ८२ लाख, रेंगडीमुरा- मेढा रस्त्यावरील पुलासाठी १ कोटी ५० लाख रुपये निधी मिळाला. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी गेल्या पाच वर्षात सातारा आणि जावली मतदारसंघातील विकासकामांसाठी कोट्यवधी निधी उपलब्ध करुन दिला. बहुसं‘य कामे मार्गी लागली असून उर्वरीत सर्वच कामे प्रगतीपथावर आहेत. दुर्गम अशा जावली तालुक्यातील प्रत्येक गावात कोट्यवधीची विकासकामे करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी राज्याच्या राजकारणात एक आदर्श निर्माण केला आहे. डोंगराळ भागातील प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडून प्रत्येक गावात अंगणवाडी, प्राथमिक शाळेच्या इमारती बांधून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी या भागातील जनतेला खर्या अर्थाने ज्ञानाची कवाडे खुली करुन दिली आहेत. केवळ विकासकामे करण्याकडेच कल न ठेवता आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीही सातत्याने प्रयत्न केले आहेत. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून विकासाचा झंजावात असाच सुरु राहणार असून येत्या काही दिवसांत सातारा- जावली मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलेला पहावयास मिळेल हे निश्चित !
जनहिताचे निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी करणारे नेतृत्व अशी ‘याती आ. शिवेंद्रसिंहराजे यांची आहे. सातारा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासकामाच्या रुपाने आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे विचार पोहचले असून आ. शिवेंद्रसिंहराजे हे जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. आ. शिवेंद्रसिंहराजे आणि जनतेतील प्रेम आणि जिव्हाळा एवढा वाढला की, सामान्य कार्यकर्ताच नव्हे तर सामान्य माणूसही आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी थेट संपर्क साधू लागला. मागेल ते काम पुर्ण करण्याची धमक आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामध्ये असल्याने सातारा आणि जावली तालुक्यातील प्रत्येक गावात डांबरी रस्ता, वीज, समाजमंदीर, अंगणवाडी, शाळा इमारत, पाणीपुरवठा योजना असा चौङ्गेर विकास झाला आहे. जनसामान्य थेट आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे येवू लागल्याने आपोआपच ऋणानुबंध वाढत गेला आणि आ. शिवेंद्रसिंहराजे हे आपल्या घरातीलच एक सदस्य आहेत अशी भावना जनसामान्यांमध्ये वाढीस लागली. सुरुवातीला विवाह सोहळ्याला उपस्थित राहणारे आ. शिवेंद्रसिंहराजे कोणताही भेदभाव न ठेवता मतदारसंघातील जनतेच्या सुख- दुख:त सहभागी होवू लागले आणि आ. शिवेंद्रसिंहराजे आणि जनता यांचे घनिष्ठ नाते निर्माण झाले आहे.
जनतेने वेळोवेळी टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आपली जबाबदारी नेहमीच पार पाडली आहे. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना भूरळ घातली. यामुळेच आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या भोवती युवा कार्यकर्त्यांचे मोहोळ वाढू लागले. नगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थावर सत्ता असताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विविध पदांवर सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांलाही संधी दिली आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या निस्वार्थी स्वभावामुळे हजारो कार्यकर्ते त्यांच्याशी मनाने जोडले गेले आहेत. केवळ कार्यकर्त्यांची ङ्गौज सोबत मिरवणार्या नेत्यांना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी एक आदर्श घालून दिला आहे. कार्यकर्त्यांना केवळ ङ्गिरवण्यापेक्षा त्यांच्या हातला काम मिळाले पाहिजे, कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे, हीच भुमिका आ. शिवेंद्रसिंहराजे यांची असल्याचे अनेक उदाहरणांवरुन स्पष्ट होते.
आपला समाजसेवेचा वसा जपण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे नेहमीच प्रयत्नशील असतात. विकासाच्या झंजावातामुळे सातार्याप्रमाणेच जावलीतील कार्यकर्ते आणि सामान्य जनता आ. शिवेंद्रसिंहराजेंसोबत जोडली गेली आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे कोणत्या राजकीय पक्षात आहेत, याहीपेक्षा ते जनतेच्या ह्रदयात कायस्वरुपी आहेत, हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. सातार्यासह जावलीतील प्रत्येक गावात मुलभूत सोयी- सुविधा पुरवून, विकासापासून वंचीत राहिलेल्या जनतेला त्यांनी प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. सत्ता कोणाचीही असो मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी खेचून आणणारे एकमेव लोकप्रतिनिधी अशी ‘याती असलेल्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मतदारसंघातील अनेक महत्वकांक्षी प्रकल्पांना भरिव निधी मिळवून ही कामे मार्गी लावली आहेत. सातारा- जावलीचा विकास हाच आपला ध्यास हे ब‘ीद घेतलेल्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आपल्या कतृत्वाने हे ब‘ीद सार्थ केले आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी कोणतीही तडजोड न करता आपले कर्तृत्व, जनतेचे प्रेम आणि पाठिंब्याच्या जोरावर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा- जावली मतदारसंघाचा कायापालट केला आहे. हा मतदासंघ विकासाचा रोल मॉडेल ठरावा यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे प्रयत्न असून आगामी काळात त्याचा प्रत्यय येईल, हे निश्चित!
- अमर मोकाशी
(जनसंपर्क अधिकारी, सातारा)