शिवजन्मोत्सव डी. जे. मुक्त करून नवीन आदर्श : सचिन मोरे 


शिवजन्मोत्सव डी. जे. मुक्त करून नवीन आदर्श : सचिन मोरे 


 पुणे - छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पुणे शहरात पोलीस प्रायव्हेट सेक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम (पी-४) महाराष्ट्र राज्य व भारत शिल्ड फोर्से प्रा.ली या संस्थेच्या वतीने हडपसर मधील शाळेत शिकणाऱ्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. पहिली ते दहावी मधील मनपा मध्ये गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्याचा मानस संस्थेचे समन्वयक श्री.सचिन मोरे यांनी व्यक्त केला आहे. या कार्यक्रमात अनेक सुरक्षा संस्थेचे चालक मालक तसेच हडपसर पोलीस स्टेशन चे श्री.देशमुख साहेब उपस्थित होते.


शिवजन्मोत्सवच्या पूर्वसंध्येला या कार्यक्रमाचे आयोजित केलं होते. या वेळी जवळपास २२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पी-४ चे समन्वयक श्री.सचिन मोरे यांनी आपल्या विचारतून सांगितले कि आजचा काळ हा सर्वात शिक्षणासाठी महत्वाचा असून शिवाजी महाराज यांच्या विचार हा ज्ञान व कौशल्यातून स्वत: आम्ही अवलंबून एक नवीन उपक्रम राबविला आहे. याचा आम्हाला अभिमान वाटत असून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे विचार पेरले ते आत्मसात करून लहान मुलांच्यात देखील आम्ही ते रुजविण्याचा प्रयत्न करणार आहोत. येणाऱ्या काळात आम्ही समाजपोयोगी विविध उपक्रम घेणार आहोत अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.


समाजात विद्यार्थीदशेत असताना शिवाजी महाराजांचे गुण कौशल्य जोपासणे हाच संदेश देण्यासाठी शिवजन्मोत्सव साजरा केल्याचे मत यावेळी चालक-मालक यांनी व्यक्त केलं.


शिवजन्मोत्सवात शांतता व सलोख्यात साजरे करण्याची परंपरा हडपसर  परिसरात आहे. शहरात सर्व महापुरुषांच्या जयंती व विविध उत्सव शांततेत साजरे केले जातात. शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून उत्सव साजरे, करून पोलिसांना सहकार्य करावे व डीजे मुक्त शिवजन्मोत्सव साजरे करा असे  आवाहन  पी ४ उपक्रमातील चालक मालक यांनी केले होते.