संचारबंदीच्या काळात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई अलर्ट... “कोयना दौलत” मधून वर्क फॉर्म होम


संचारबंदीच्या काळात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई अलर्ट... “कोयना दौलत” मधून वर्क फॉर्म होम


कराड - महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनो आजाराचा वाढता पार्दुभाव लक्षात घेता संपुर्ण देशात सुरु असलेली संचारबंदी व जमावबंदीमुळे बाहेर पडता येत नसले तरी राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे संचारबंदीच्या काळातही २४ बाय ७ अलर्ट असून सातारा येथील कोयना दौलत निवासस्थान मधून त्यांचे वर्क फॉर्म होम सुरु आहे.संचारबंदीच्या काळात आपल्या मतदारसंघासह राज्यातील परिस्थितीचा ते “स्टे होम” करीत आढावा घेत आहेत.


कोरोनासंदर्भातील जनतेच्या समस्या सोडविताना व प्रशासनाला अलर्ट राहणेकरीता सुचना देतांनाचे कोयना दौलत निवासस्थानाच्या पुढील कट्टयावर काही काळ विरंगुळा म्हणून बसलेले गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे छायाचित्र सध्या सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात प्रसारित झाले असून “मंत्री असावा तर असा” अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यामधून सोशल मिडीयावर उमटत आहेत.


 भारत देशासह अनेक देशामध्ये कोरोना आजाराने मोठे थैमान घातले आहे.देशाचे पंतप्रधान यांनी संपुर्ण भारत देशामध्ये २१ दिवसांचे लॉकडाऊन करुन सगळया राज्यांमध्ये संचारबंदी लागू केली आहे.राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनीही महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना आजारासंदर्भात दक्षता घेणेकरीता ठोस अशी पाऊले उचलली आहेत.सातारा जिल्हयातही कोरोनाचा संसर्ग फैलावू नये म्हणून शासनाच्या आदेशावरुन अनेक ठिकाणी नाकाबंदी व बाहेरच्या लोकांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे.कोरोनाचा सामना करणेकरीता सर्वच स्तरावरुन योग्य त्या उपाययोजना राबविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून यामध्ये सातारा जिल्हा प्रशासनासह जिल्हयातील लोकप्रतिनिधींनीही याकरीता पुढाकार घेतला आहे.संचारबंदीच्या काळात घरात थांबून लोकप्रतिनिधी आपआपल्या मतदारसंघात या आजारासंदर्भातील उपाययोजनेकरीता व मतदारसंघातील जनतेकडे विशेष लक्ष ठेवून आहेत.


सातारा जिल्हयातील पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्यावर राज्याचे गृहराज्यमंत्री म्हणून जबाबदारी आहे.त्यांनी राज्यामध्ये २१ दिवसांची संचारबंदी लागू होण्यापुर्वीच कोरोना आजारासंदर्भात उपाययोजना करण्याकरीता आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघात तालुका प्रशासनाच्या तीन तीन वेळा बैठका घेवून तालुका प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सुचना केल्या आहेत. तर प्रतिरोज ते तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून दुरध्वनीवरुन कोरोनासंदर्भातील घडामोडींचा आढावा घेत आहेत. २१ दिवसांची संचारबंदी व ठिकठिकाणी नाकाबंदी तसेच जिल्हाबंदी असल्यामुळे मुंबई,पुणे या शहरात मोठया प्रमाणात अडकून पडलेल्या मतदारसंघातील जनतेला दिलासा देणेकरीता तसेच त्यांची आहे त्याच ठिकाणी सोय करणेकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे २४ बाय ७ कसोशीने प्रयत्न करीत आहेत.


संचारबंदीच्या काळात घरी राहण्याच्या सुचना असल्या तरी जनतेची आपल्यावर असणारी जबाबदारी न झटकता ते हिरीरीने घरातूनच त्यांना येणारे सर्व फोन स्विकारुन जनतेला या काळात आवश्यक ती मदत करीत असल्याचे दिसून येत आहे.सातत्याने घरात बसून कंटाळा आला की थोडा वेळ घराच्या पुढील कट्टयावर विरुंगळा म्हणून बसले तरी येणारे सर्व फोन स्विकारुन जनतेचे प्रश्न एैकून त्यावर तोडगा काढत त्यांना मदत करण्याचे काम ना.शंभूराज देसाईंकडून सुरु असून असेच घराच्या कट्टयावर बसून फोनवरुन जनतेचे प्रश्न सोडवितांना व प्रशासनाला कोरोनासंदर्भात अलर्ट राहण्याच्या सुचना देतानाचे एक छायाचित्र सध्या सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात प्रसारित झाले असून “मंत्री असावा तर शंभूराज देसाईंसारखा” अशा प्रतिक्रिया हे छायाचित्र पाहून सोशल मिडीयावर सर्वसामान्यामधून उमटू लागल्या आहेत.