कराडचा शिक्षण महोत्सव राज्याला दिशादर्शक ठरेल : पालकमंत्री बाळासाहेब पाटील कराड शिक्षण महोत्सवाचे उद्घाटन


कराडचा शिक्षण महोत्सव राज्याला दिशादर्शक ठरेल : पालकमंत्री बाळासाहेब पाटील
कराड शिक्षण महोत्सवाचे उद्घाटन


कराड - विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढसाठी राज्यात कराड तालुक्यातच शिक्षण महोत्सवाचे आयोजन केले जाते. हा उपक्रम राज्याने स्विकारला आहे.ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतुनच शिकलेले अनेक विद्यार्थी आज अधिकारी झाले आहेत.असे प्रतिपादन सहकार, पनण व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.


सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती कराड यांच्यावतीने आयोजित केलेल्या कराड शिक्षण महोत्सव २०२०चे ,शिक्षण दालनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार श्रीनिवासजी पाटील हे होते. प्रमुख उपस्थितीती मध्ये शिक्षण,क्रिडाव अर्थसमितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, पंचायत समिती सभापती प्रणव ताटे,उपसभापती रमेश देशमुख, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, माजी सभापती सुहास बोराटे, सदस्य रमेश चव्हाण, अँड शरद पोळ,काशिनाथ कांरडे, राष्ट्रवादीयुवा काँग्रेस कराड उत्तर चे अध्यक्ष प्रशांत यादव,बाळासाहेब निकम,गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर, महाबळेश्वर गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे,शालेय पोषण आहार अधिक क्षक विजय परीट, शिक्षण विस्तार अधिकारी जमिला मुलाणी,चंद्रकांत निकम,लालासाहेब पाटील याची होती.


पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले आज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा शिक्षणाचा दर्जा सुधारला आहे. शाळामधुन विविध सहशालेय उपक्रम राबविले जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढत आहे. आपल्या तालुक्यातील अनेक उपक्रम राज्याला दिशादर्शक ठरत आहेत.देशाच्या जडणघडणीत महिलाचे योगदान ही चांगले आहे. आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिक्षण महोत्सव घेतला आहे ही बाब कौतुकास्पद आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात ही शिक्षणासाठी भरीव तरतूद केली आहे.


खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले ,स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबाच्या भुमीमध्ये आज शिक्षण महोत्सव साजरा होतो आहे ही बाब अभिमान स्पद आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधून च विद्यार्थ्यांवर संस्कार घडत आहेत. लहान वयात च विद्यार्थ्यांवर झाले ले संस्कार कायमस्वरूपी टिकतात.सातारला भव्यदिव्य पंरपरा आहे.क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, सोयराबाई, सईबाई,महाराणी ताराबाई या महिला आपल्या जिल्ह्यातील आहेत. सातारचे स्त्रीधन सर्वात मोठे आहे. यावेळी त्यांनी शालेय जीवनातील विविध किस्से सांगितले.


शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे म्हणाले तालुक्याप्रमाणे जिल्हा चा ही शिक्षण महोत्सव घेतला जाणार आहे यामुळे आपल्या मराठी शाळांचा दर्जा उंचावणार आहे.इंग्रजी माध्यमातून अनेक विद्यार्थी गतवर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये आले आहेत. विद्यार्थ्यांसाठी एक ड्रेस कोड केला जाईल. तसेच जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा साठी बसतील त्याची सर्व फी ही जिल्हा परिषद मार्फत दिली जाईल यामुळे अनेक गरिब होतकरू मुले सहभागी होतील.


यावेळी सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. या शिक्षण महोत्सव कार्यक्रम प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी केले स्वागत सभापती व उपसभापती यांनी ,सुत्रसंचलन अनंत आघाव,विजय गवळी यांनी व आभार रमेश चव्हाण यांनी मानले.कोरोला संसर्गजन्य काळजी घ्यावी


पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की आजकाल सर्व काही चायनामेड आहे याला लोकांचे याकडे आकर्षन आहे. तेथूनच आज करोना व्हायरस पसरत आहे याची काळजी सर्वानी घ्यावी. हा संसर्गजन्य रोग आहे. आजच्या बदलत्या जीवन शैलीत अशा अनेक संकटाना तोंड द्यावे लागत आहे