विज्ञान हा जीवनाचा अविभाज्य घटक  केशवराव पवार स्कूलमध्ये प्रदर्शन


विज्ञान हा जीवनाचा अविभाज्य घटक 
केशवराव पवार स्कूलमध्ये प्रदर्शन


कराड  - विज्ञानाची दैनंदिन जीवनाशी सांगड घालून  मानवी जीवन समृद्ध बनले आहे. विज्ञान हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. विद्यार्थी कृतीतून शिकत असतो. गणितीय व वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करण्याच्या हेतूने सदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. परिसर अभ्यास, विज्ञान व कला विषयावर आधारित साहित्य मांडण्यात आले होते. 


रयत शिक्षण संस्थेच्या  केशवराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विज्ञान दिनाचे औचित्य साधून केजी विभागाच्या कला व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. ए एस साळुंखे, डी बी सावंत, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲड रविंद्र पवार यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सौ सुप्रियाताई पवार , एम टी पवार, टी एन चव्हाण , मुख्याध्यापिका आर एन पवार , के जी मुख्याध्यापिका व्ही यू तांबवेकर, प्रभारी मुख्याध्यापक आर एस पवार, प्रशासकीय अधिकारी आर टी पाटील उपस्थित होते. 


विद्यार्थ्यांनी बनविलेले वैज्ञानिक तक्ते प्रतिकृती तसेच वैज्ञानिक उपकरणे व प्रयोग , सौर ऊर्जेवरील उपकरणे , सूर्यमाला ,  चांद्रयान , मंगळयान , हवेच्या दाबावरील उपकरणे , रेन वॉटर हार्वेस्टिंग ,आरोग्याशी संबंधित प्रोजेक्ट तसेच पर्यावरण संवर्धन यावर आधारित प्रकल्पांचे सादरीकरण केले.  यावेळी ए एस साळुंखे, ॲड रविंद्र पवार , डी बी सावंत , सौ प्रिती करडे , सौ जगताप मॅडम तसेच सहभागी शिक्षकांनी आपले विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक श्रीमती आर एन  पवार ,सूत्रसंचालन दत्तात्रय पोळ व आभार श्रीमती व्ही यू तांबवेकर यांनी मानले.