काँग्रेस आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला...खासदारही वेतन पंतप्रधान सहाय्यता निधीला देणार


काँग्रेस आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला...खासदारही वेतन पंतप्रधान सहाय्यता निधीला देणार


मुंबई - कोरोना विषाणूचे संकट गंभीर असून त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्व ती मदत करण्याची आवश्यकता आहे. काँग्रेस पक्षही मदतीसाठी प्रयत्नशील आहे. या कठीण प्रसंगी सरकारला आर्थिक मदत करण्यासाठी काँग्रेस पक्षाने विधानसभा व विधान परिषदेतील आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तसेच लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांचे एक महिन्याचे वेतन पंतप्रधान मदत निधीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली आहे.


कोरोनाचे संकट जगभर गंभीर झाले असून देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सरकारी पातळीवरून सर्व प्रयत्न केले जात आहे. अनेक सामाजिक संस्था, उद्योगपती, तसेच व्यक्तीगत पातळीवरूनही सरकारला आर्थिक मदत करण्यासाठी हजारो हात पुढे आले आहेत. काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांनी एक महिन्याचे वेतन मदत निधीसाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. काँग्रेस पक्षातील ज्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत जमा करण्याची इच्छा आहे त्यांनी, महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या, मुख्यमंत्री_सहाय्यता_निधी_कोविड-19 या स्वतंत्र बँक खात्यात आपली मदत जमा करावी, असे आवाहनही थोरात यांनी केले आहे.


मुख्यमंत्री सहाय्यता निधी खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.


Chief Minister’s Relief Fund-COVID 19


मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19


बँकेचे_बचत_खाते_क्रमांक-: 39239591720


स्टेट बँक ऑफ इंडिया,


मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023


शाखा कोड 00300


आयएफएससी_कोड-: SBIN0000300


Popular posts
पुणे जिल्ह्यातील परप्रांतीय मजुरांना वनराईतर्फे शिधावाटप
Image
डॉ. अतुल भोसले यांचा विरोधकांना सवाल...इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले ? त्यांना तुरूंगात का जावे लागले ? या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत 
Image
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
सातारा - पुणे महामार्गावरील खड्डे 15 मार्चपर्यंत बुजवावेत.....पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील रस्ते कामांचा आढावा
Image
  स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय नॉन कोविड जाहीर करावे,... डॉ. प्रकाश शिंदे यांच्या हलगर्जीपणामुळे कराडला गंभीर धोका निर्माण झाला... "कोरोना"च्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा
Image