खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला दीड कोटीचा निधी


खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला दीड कोटीचा निधी


कोल्हापूर -संपुर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना(Covid 19) या विषाणू च्या कोल्हापूर, सांगली येथे वाढणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता या रुग्णांना पुणे मुंबई च्या धर्तीवर अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या खासदार निधीतून दीड कोटीचा निधी दिला आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (C.P.R) आणि महानगर पालिकेच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक साधनसामुग्री साठी हा निधी वापरला जाणार आहे.


संकट महाभयंकर आहे. याला तोंड देण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री फार मोठी आहे. पण मी खारीचा वाटा उचलला आहे, प्रत्येकांनी थोडा हातभार लावल्यास निश्चितपणे आपण सर्वजण आलेल्या संकटाला परतवून लावू.माझा विश्वास आहे करोना हरणार आपण जिंकणार.


या निधीतून कोल्हापूरसाठी खालील गोष्टींची पुर्तता करण्यात येणार आहे.
3 adult Ventilator- 30 lakh,
2 neonatal ventilator-  20 lakh,
videolaryngoscope 4  -6 lakh
portable x-ray machine 150 ma -  6 lakh
ventilator circuit 500adult –6 lakh
neonatal 100- 1.5 lakh
Cardiac ambulance 45 lakh 4Ambulance


कोल्हापूर महानगर पालिकेसाठी कोरोना च्या उपचारासाठी लागल्यास आणखी निधी देऊ, मात्र जनतेने दक्ष रहावे, काळजी घ्यावी, घराबाहेर पडू नये, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.