श्री संतकृपा इंजिनीरिंग मध्ये राज्यस्तरीय टेक्निकल स्पर्धेचे आयोजन
कराड - घोगाव तालुका कराड जिल्हा सातारा येथील श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयांमध्ये सोमवार दिनांक 16 मार्च 2020 रोजी अभिव्यक्ती 2K20. या राज्यस्तरीय टेक्निकल स्पर्धेचे आयोजन केले आहे.
यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील डिप्लोमा व डिग्री तसेच जुनिअर कॉलेज मधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यामध्ये सुमारे 800 स्पर्धक सहभागी होतील. यामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन केले आहे. विजेत्या स्पर्धकांना व संघांना आकर्षक रोख स्वरूपाची बक्षिसे व सन्मानपत्र देण्यात येणार आहे.
यामध्ये प्रोजेक्ट कॉम्पिटिशन साठी प्रथम क्रमांक रुपये 2500, तसेच द्वितीय क्रमांक रुपये 2000., क्विज कॉम्पिटिशन साठी प्रथम क्रमांक रुपये 2500 तसेच, द्वितीय क्रमांक रुपये 2000, पेपर प्रेझेंटेशन साठी प्रथम क्रमांक रुपये 3000 ,द्वितीय क्रमांक रुपये 2000, बॉक्स क्रिकेट डिप्लोमा व ज्युनिअर कॉलेज. तसेच मुलींच्यासाठी कॅरम आणि बुद्धिबळ यामधील विजेत्यांसाठी एकूण रुपये 7000./ अशी घवघवीत बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील, उपाध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, संचालक सागर पाटील यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत.
सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त टेक्निकल महाविद्यालयांनी या स्पर्धेसाठी सहभागी व्हावे असे आवाहन श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाचे प्राचार्य स्वानंद कुलकर्णी यांनी केले आहे.
या स्पर्धेसाठी श्री संतकृपा इंजिनिअरिंगचा क्रीडा विभाग तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व प्रकारची जय्यत तयारी केली आहे.