"सह्याद्रि" राज्यातील इतर कारखान्यांसाठी आदर्शवत - साखर आयुक्त सौरभ राव


"सह्याद्रि" राज्यातील इतर कारखान्यांसाठी आदर्शवत - साखर आयुक्त सौरभ राव


 कराड - "सह्याद्रि" साखर कारखाना हा  महाराष्ट्रामध्ये एक अग्रगण्य साखर कारखाना असून अत्यंत काटेकोर नियोजनाने चाललेला कारभार कौतुकास्पद आहे. राज्यातील इतर कारखान्यांसाठी आदर्शवत आहे असे मत साखर आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केले.


 "सह्याद्रि" कारखान्याला भेटी दिली. कारखान्याचे संचालक मानसिंग जगदाळे व जशराज पाटील यांनी साखर आयुक्त सौरभ राव यांचे स्वागत करून सत्कार केला केले. उपाध्यक्ष लक्ष्मी गायकवाड, संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती.
    
सौरभ राव म्हणाले, सहकारी कारखाना सभासदांनी संचालक मंडळावर ठेवलेल्या विश्वासावर चालत असतो, "सह्याद्रि" हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. कारखान्याची वर्षानुवर्षे होत असलेली प्रगती पाहता कामकाज उत्तम प्रकारे चालत असल्याचे लक्षात येते. राज्यात बहुतांशी कारखान्यांची अर्थ व्यवस्था कोलमडली असल्यामूळे ज्या कारखान्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत आहे अशा कारखान्यांना भेटी देऊन त्यांच्या नियोजनाचा इतर कारखान्यांना कसा फायदा होईल याचा अभ्यास करता येईल.


कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी सूत्रसंचालन करून प्रास्ताविक केले. कारखान्याची प्रतिदिन 1250 मे.टनापासून 7500 मे.टनापर्यंत व नियोजित 11000 मे.टनाची विस्तारवाढ, शैक्षणिक सुविधा, दुष्काळ गस्तांना सहाय्य, घरकुल योजना, विहीर बोअरींग योजना, गोबर गॅस योजना, पाणंद रस्ते सुधारणा योजना, जलयुक्त आदिबाबत स्लाइड शोच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली.


साखर आयुक्त सौरभ राव यांनी कारखान्याचा ऊस वजन काटा, अभियांत्रिकी विभाग,उत्पादन विभाग, मिल हाउस, बॉयलर, पॉवर हाउस, शुगर हाउस, पर्यावरणसंबंधी केलेल्या उपाययोजना, वनिकरण, पीट कंपोस्ट, डिस्टलरी प्रकल्प आदी ठिकाणी समक्ष जाऊन माहिती घेतली. जनरल मॅनेजर पी.आर.यादव, चीफ केमिस्ट जी.पी.करांडे, डिस्टलरी इनचार्ज डी.जी.जाधव, शेती अधिकारी एम.ए.पाटील, ऊस विकास अधिकारी व्ही.बी.चव्हाण, पर्यावाण इंजिनिअर एच.जे.माने यांनी माहिती दिली.


आर्थिक बाबीविषयी कारखान्याचे फायनान्सियल अ‍ॅडव्हायझर एच.टी.देसाई यांनी ताळेबंद, नक्तमुल्य, बाहेरील कर्ज घेण्याची क्षमता, नफा तोटा पत्रक आदींची माहिती देवून, चालू 2019 - 20 हंगामापर्यंत मागील कोणत्याही हंगामाची ऊस दर देय बाकी काहीही नाही, चालू हंगामात गळीतास आलेल्या उसाचे एफआरपी दराप्रमाणे संपूर्ण पेमेंट वेळेत अदा केले आहे. आदी बाबींकडे सौरभ राव यांचे लक्ष वेधले.