शिवसमर्थ नृसिंहवाडी शाखेच्या व्दितीय वर्धापनदिनी मान्यवरांची मांदियाळी

शिवसमर्थ नृसिंहवाडी शाखेच्या व्दितीय वर्धापनदिनी मान्यवरांची मांदियाळी

कराड - इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे रंगाची उधळण करत सर्वत्र रंगपंचमी साजरी  झाली. रंगाचा उत्सव असलेल्या रंगपंचमीच्या या दिवशी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को.आॅप.क्रेडीट सोसायटी लि; तळमावले च्या नृसिंहवाडी शाखेचा व्दितीय वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. मान्यवरांच्या मांदियाळीने संपूर्ण परिसर उजळून गेला.


रंगांने प्रसन्न वातावरण झालेल्या नृसिंहवाडी शाखेचा व्दितीय वर्धापनदिनानिमित्त सरपंच जयश्री खिरुगडे, डाॅ.अहमद पन्हाळकर इतर मान्यवरांची उपस्थिती होती.


सकाळच्या रम्य प्रहरी शास्त्रोक्त पध्दतीने श्री सत्यनारायण पूजा संपन्न झाली. भक्तिमय वातावरणात तीर्थप्रसाद घेण्यासाठी परिसरातील मान्यवरांनी शाखेस सदिच्छा भेटी दिल्या. संस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे व सामाजिक जाणिवांचे त्यांनी मनःपूर्वक कौतुक करत शाखेला शुभेच्छा दिल्या. 13 मार्च ते 14 एप्रिल या कालावधीत सर्व प्रकारच्या मुदत ठेवीवर 1 टक्के ज्यादा व्याजदर देण्यात येणार असल्याने या विशेष ठेव योजनेचा लाभ बहुतांशी ठेवीदार, ग्राहकांनी घेतला.


श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदीर देवस्थानच्या पश्चिमेस असलेल्या दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को.आॅप.क्रेडीट सोसायटीच्या प्रांगणात तसेच कार्यालयात संस्थेच्या वतीने उपस्थितांना प्रेमाची शाल, श्रीफळ, शिवसमर्थ विशेषांक, पत्रके देवून सन्मान केला जात होता. त्यामुळे येणारे ग्राहकही तितक्याच आपुलकीने येत होते. अनेक ठेवीदार, ग्राहक यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.


भजनी मंडळाने हार्मोनियम, तबला, टाळ यांच्या तालावर सुरेख अभंग, ओव्या, गौळणी म्हणत नृसिंहवाडी शाखेचे पटांगण व पार्कींग तळ आपल्या सुरेल आवाजाने मंत्रमुग्ध करुन टाकला. सुमारे पावणेदोन तास आपल्या सुश्राव्य भजनाने सभोवतालच्या वातावरणामध्ये भक्तीभाव निर्माण केला.


प्रारंभी पिंपळाच्या भव्य वृक्षाच्या पायथ्याशी पश्चिमाभिमुखी ठेवलेल्या शिवसमर्थ च्या प्रतिमेचे पूजन अरुण शिंदे, किरण बाबर, रविंद्र साखेकर, महादेव कबाडे, मुकूंद कुमठेकर या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडले. त्यानंतर आपल्या ज्योतीने सभोवतालचा परिसर प्रकाशमान करणाया ज्योतींचे मान्यवरांनी दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमामध्ये जान आणली. वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचा सुंदर शुभारंभ केला.


संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे, उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे वर्धापनदिन कार्यक्रमाला खÚया अर्थाने उंची प्राप्त झाली.


कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी चंद्रशेखर चंदुरे, विष्णूपंत माने, शेखर चव्हाण, अभय तारदाळे, आकाश जगताप, शुभम पवार, स्नेहा मोरे, संदीप डाकवे, युवराज माने, विलास घारे यांनी विशेष परिश्रम घेतले.