६६ हजार जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी सत्तावीशे कोटीची मदत मिळणार

६६ हजार जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी सत्तावीशे कोटीची मदत मिळणार


कराड - राज्यातील सर्वच ६६ हजार जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे.यासाठी इशिमन.डेव्हलपमेंट बँक सत्तावीशे कोटीची मदत करणार आहेत अशी माहिती शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी कराड येथे दिली. 


शाळांमध्ये बदल घडवून आणन्याचे काम फक्त शिक्षकच करु शकतो. आज राज्यात शिक्षकांनी मनापासून काम केलेने ३00 शाळा सक्षम झाले असुन गुणवत्ता वाढली आहे. मुलांचे शिक्षण हे मात्र, मराठी भाषेतुनच झाले पाहिजे. संवाद हा महत्त्वाचा भाग आहे मग तो शिक्षक - पालक किंवा शिक्षक - विद्यार्थी व पालक यांचा असो.या संवादातून मुलांची जडणघडण होत असते. पालकांनी मुलांची आवड,निवड ,कल,पाहून त्यांना शिक्षण दिले पाहिजे.जेथे ज्ञान चांगले मिळते तिथेच पालक मुलांना शाळेत प्रवेश घेतात असे शालेय उपसचिव राजेंद्र पवार यांनी सांगितले.