सुट्टीत होणार शिक्षकांचे अधिवेशन

सुट्टीत होणार शिक्षकांचे अधिवेशन


कराड  - राज्यात शिक्षकांच्या अनेक संघटना आहे. प्रत्येकांचे अधिवेशन वेगवेगळ्या तारखांना होत असते. यामुळे राज्य शासनाने शिक्षक संघटनांच्या अधिवेशनाबाबत नियमावली जाहीर करून त्याप्रमाणे अधिवेशन घ्यावे अशा सूचना केल्या आहेत.दिर्घ सुट्टीच्या काळामध्ये अधिवेशन घेण्याच्या सूचनाही केल्या आहेत.


शिक्षक संघटनांचे अधिवेशन दीर्घ सुटीतच घ्यावेत. अन्य काळात अधिवेशनाचा प्रस्तावही दाखल करू नये, असे स्पष्ट आदेश शासनाने जारी केले आहेत. राज्यस्तरीय अधिवेशन तीन दिवस आणि जिल्हास्तरीय दोन दिवसांपेक्षा जास्त असता कामा नये, अशी अटही घातलण्यात आली आहे.


शिक्षक अधिवेशन आणि जोडून आलेल्या रजा, सुविधांमुळे सातत्याने गोंधळ होत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने स्पष्ट आदेश जारी करीत शिक्षक अधिवेशनाबाबत धोरण जाहीर केले आहे. अधिवेशनाला रजा मागणारी संघटना मान्यताप्राप्त असावी. दीर्घ सुटी काळात अधिवेशन घ्यावे. शिक्षण संचालकांची पूर्व परवानगी घ्यावी. विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, अशा काळात अधिवेशन घेता येणार नाही. सरकार मान्यता देणार नाही.


मान्यतेचा प्रस्तावही दाखल करू नये, असे आदेशात म्हटले आहे. अधिवेशनात अशैक्षणिक कार्यक्रमाचा अंतर्भाव असू नये. जाण्या-येण्याचा खर्च व इतर खर्च शिक्षकांनी स्वतः करायचा आहे. भत्ते सरकार देणार नाही. अधिवेशनास वर्षात एकाच संघटनेच्या कार्यक्रमाला हजर राहता येईल. तेवढीच रजा मिळेल. अधिवेशनास हजर असल्याची खातरजमा करूनच रजा मंजूर केली जाईल, अशा अटीही घातल्या आहेत.


Popular posts
१५ एप्रिल नंतर मोफत तांदुळ होणार उपलब्ध
साताऱ्यातील 5 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह; 4 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल; यापैकी नऊ महिन्याच्या बाळाचा श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गाने मृत्यू
Image
राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
Image
डॉ. अतुल भोसले यांचा विरोधकांना सवाल...इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले ? त्यांना तुरूंगात का जावे लागले ? या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत 
Image
शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना संचालकपदी प्रा.अभय जायभाये रुजू
Image