उन्हात बसून प्रतिकारशक्ती वाढवा, कोरोनाला पळवुन लावा--डॉ.आनंदगावकर यांचा सल्ला


उन्हात बसून प्रतिकारशक्ती वाढवा, कोरोनाला पळवुन लावा--डॉ.आनंदगावकर यांचा सल्ला


माजलगाव - कोरोनाशी लढायचे असेल तर घाबरू नका,आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दररोज सकाळी उन्हात बसा, फळे-भाजीपाला आपल्या वजनाच्या दुप्पट ग्रॅम खा, त्यातून प्रतिकारशक्ती वाढवून कोरोनाला पळवून लावा असा सल्ला मराठवाड्यातील नामवंत डॉक्टर प्रकाश आनंदगावकर यांनी दिला आहे.


संपूर्ण जगाला कोरोनाच्या व्हायरसने चिंताक्रांत केले आहे,आपल्या देशातही त्याची लागण वेगाने वाढत असल्याने त्यावर प्रशासन उपाय योजना करत आहे.नागरिक घराघरांत बसले असले तरी प्रत्येकाच्या मनात एक भीती पसरली आहे. कोरोनाबाबत डॉ.प्रकाश आनंदगावकर म्हणाले की,कोरोना होऊ नये यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात उपाय योजना सुरू केल्या आहेत. मात्र नागरिकांनी देखील काही गोष्टी पाळल्या पाहिजेत.कुठलाही विषाणू १०१-१०२ तापमानात मरतो, त्यासाठी शरीरातील रक्ताची गर्मि वाढली पाहिजे,उन्हासारखी प्रतिकारशक्ती कशातही नाही त्यातून विटामिन 'डी' मिळते, म्हणून दररोज सकाळी उन्हात अर्धा तास तरी बसले पाहिजे.


याबरोबरच विटामिन 'ए' व 'डी' शरीराला आवश्यक आहे म्हणून आंबटसर असलेले संत्री,मोसंबी, अंगुर ही फळे व गोबी,मेथी,काकडी, गाजर, मुळा या भाज्या कच्चा खाव्यात.दिवसभरात आपल्या वजनाच्या दुप्पट ग्रॅम फळे-भाज्या खाल्या पाहिजेत.ज्यास खोकला आहे,त्यांनीच मास्क लावावा,सर्वांनी मास्क लावणे गरजेचे नसून सतत मास्क लावल्याने कार्बनडायऑक्साईड त्यावर जमा होतो,म्हणून गरज असेल तरच तो वापरावा. गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तोंडाला हात लावू नका, आपले हात साबणाने स्वच्छ धुवून मगच सर्व कामे करा असे डॉ.आनंदगावकर यांनी सांगितले.


 


Popular posts
चहा नव्हे अमृततुल्य, कराडच्या युवकांचा अभिनव उपक्रम......शिवनेरी अमृततुल्य
Image
जिल्हा परिषद पाझर तलावांची ठेका रक्कम कमी करावी..... सातारा जिल्हा मत्स्यव्यवसाय संघाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन  
Image
कृषी घटकांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या स्मार्ट प्रकल्पाचे मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण
Image
राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
Image
कोरोना लस संशोधन प्रकल्पात कृष्णा हॉस्पिटलचा सहभाग कराडचे नाव झळकणार जगाच्या नकाशावर; पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून लस विकसित
Image