शासकीय आस्थापना, अत्यावश्यक सेवा, औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या यांच्यासाठी सूचना 

शासकीय आस्थापना, अत्यावश्यक सेवा, औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या यांच्यासाठी सूचना 


सातारा : कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक उपययोजना राबविण्याच्या अनुषंगाने क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार 31 मार्चपर्यंत जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी एका वेळेस 5 किंवा त्या पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास मनाई आदेश पारीत करण्यात आले होते. या आदेशामध्ये पुढीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे.


जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये यांनी त्यांचे सर्व विभाग प्रमुख यांचे सल्याने त्यांच्या स्तरावर कर्मचारी उपस्थितीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. तथापी कार्यालय प्रमुख यांनी कार्यालयात व मुख्यालयात उपस्थित राहणे आवश्यक व बंधनकारक असून, आपत्ती कालावधीत जिल्हाधिकारी यांच्या वेळोवेळीच्या आदेशाप्रमाणे माहिती, सेवा व मनुष्यबळ पुरविणे कार्यालय प्रमुखावर बंधनकारक राहील. सर्व बँका व वित्तीय सेवा तद्संबंधीत आस्थापना, अन्न, दूध, फळे व भाजीपाला, किरणा पुरविणाऱ्या आस्थापना, दवाखाने, वैद्यकीय केंद्र व औषधी दुकाने व तद्संबंधीत आस्थापना, प्रसार माध्यमे, मीडिया व तद्संबंधीत आस्थापना, दूरध्वनी, इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना, मोबाईल कंपनी टॉवर व तद्संबंधीत आस्थापना, विद्युत पुरवठा, ऑईल व पेट्रोलीयम व उर्जा संसाधने व तद्संबंधीत आस्थापना, पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा करणाऱ्या आस्थापना व वरील सर्व आस्थापनांसाठी अत्यावश्यक असणारे वेअर हाऊस, शासकीय इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, पशुखाद्य निर्मिती करणारे कारखाने, आयटी आणि आयटीईएस आस्थापनांनी, अत्यावश्यक सेवा संबंधित वस्तू आणि मनुष्यबळ, वाहतूक करणारे ट्रक, वाहन (आवश्यक स्टिकर लावलेले) यांना प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार नाहीत.  


दि. ३१ मार्च अखेर बंद कालावधीत जिल्ह्यातील सर्व आद्योगिक क्षेत्र तसेच औद्योगिक क्षेत्रा व्यतिरिक्त मोठे उद्योग, आस्थापना व कारखाने यांच्यासाठी पुढील बाबी अपवाद राहतील. औषध निर्मिती उद्योग व टॉयलेटरी उद्योग तसेच अत्यावश्यक सेवा उदा. मेडिकल सेवा, इक्यूपमेंट इ. पुरविण्यासाठी आवश्यक असलेले उद्योग. अत्यावश्यक सेवा तसेच सदर कालावधीत चालू असणाऱ्या सेवा देण्यासाठी आयटी व आयटी संबंधित उद्योग. अत्यावश्यक वस्तू निर्माण व सेवा पुरविणारे प्रकल्प. संरक्षण विषयक प्रकल्प. सलग उत्पादन प्रक्रिया चालू असलेल्या कारखान्याच्या बाबतीत हे आदेश निर्गमित झाल्यापासून यथाशिघ्र उत्पादन बंद करावे. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या, काराखान्यामधील मॅन्टेनन्सचे काम पाहणारे कर्मचारी व सुरक्षा रक्षक कर्मचारी. या बाबतीतील शंका व स्पष्टीकरणाच्या बाबतीत जिल्हाधिकारी सातारा यांचा निर्णय अंतीम राहील.


            कोणत्याही व्यक्तीला सातारा जिल्ह्यातील कोणत्याही रस्त्यावर गल्लोगल्ली याठिकाणी सायकल तसेच पारंपारिक, अपारंपारिक इंधनावर चालणाऱ्या मोटर सायकल, (गियरसह, गियर शिवाय) सर्व प्रकारची तीन चाकी, चार चाकी वाहने, हलकी वाहने, मध्यम वजनाची वाहने यांचा प्रवास व वाहतूक यासाठी वापर करणेस मनाई करण्यात येत आहे. यातून पुढील लोकांना सूट देण्यात येत आहे.  अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी. कोरोना नियंत्रणासाठी कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी. तसेच कोरोना नियंत्रणासाठी काम करणाऱ्या खाजगी आस्थापना  व कर्मचारी. वैद्यकीय उपचाराची गरज असलेल्या व्यक्ती व अत्यावश्यक सेवा सुविधा देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या व्यक्ती. तथापि वैद्यकीय उपचारासाठी गाडीमध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त यांनाच प्रवास देय राहील.