कराड नगक्षपालिका कर्मचाऱयांचा आजपासून संपाचा इशारा नगराध्यक्षांनी कर्मचाऱयांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप




कराड नगक्षपालिका कर्मचाऱयांचा आजपासून संपाचा इशारा
नगराध्यक्षांनी कर्मचाऱयांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप

कराड  - कराड नगरपालिकेत अतिक्रमण मोहिमेनंतर सुरू झालेली आरोप, प्रत्यारोपांची धुळवड थांबायचे नाव घेत नाही. अतिक्रमण मोहिमेबाबत विशेष सभेत मुख्याधिकाऱयांवर नगरसेवकांनी ताशेरे ओढले. मात्र नगराध्यक्षांनी अतिक्रमण पथकातील कर्मचारी दारू पिऊन आले होते, असा उल्लेख केल्याचा आरोप करत नगराध्यक्षांनी कर्मचाऱयांची माफी मागावी अन्यथा सोमवारी 16 रोजी दुपारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा पत्रकाद्वारे दिला आहे.

मुख्याधिकाऱयांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पालिकेच्या विशेष सभेत मुकादम आणि कर्मचारी अतिक्रमण मोहिमेत दारू पिऊन आले होते, असा उल्लेख नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी केला आहे. सभेला नगरसेवक उपस्थित असताना त्यांनी कर्मचाऱयांबाबत अवमानकारक वक्तव्य केले आहे. कर्मचाऱयांच्या इतर मागण्यांबाबत नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्याकडे वेळोवेळी लेखी स्वरूपात मागणी केली आहे. परंतु त्याची कसलीही दखल दोघांनीही घेतलेली नाही. अवमानकारक वक्तव्याबद्दल कर्मचाऱयांमध्ये संताप आहे. सोमवारी 16 रोजी स्वच्छता अभियान पाहणीचे काम संपल्यानंतर दुपारी सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन नगरपालिकेच्या पश्चिम दरवाजासमोर करण्यात येणार आहे.

अवमानकारक वक्तव्याबद्दल नगराध्यक्षांनी कर्मचाऱयांची माफी मागावी, सर्व कर्मचाऱयांना मालकी हक्काची घरे मिळावीत, सातव्या वेतना आयोगाचा पहिला हप्ता रोखीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिलच्या आत सर्व कर्मचारी आणि पेन्शनर यांना मिळावा, मासिक वेतन 10 तारखेच्या आत मिळावे, 2005 नंतर कायम झालेल्या कर्मचाऱयांचे अंशदान पेन्शन योजनेचे खाते प्रत्येकाच्या नावाने निघाले पाहिजे आदी मागण्या कर्मचाऱयांनी केल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.