डिजीटल डिस्प्ले असणारी आबईचीवाडी तालुक्यात पहिली शाळा


डिजीटल डिस्प्ले असणारी आबईचीवाडी तालुक्यात पहिली शाळा


कराड - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आबईचीवाडी (ता. कराड) येथे अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व आबईचीवाडी गावचे सुपुत्र अमोल येडगे यांनी शाळेस ५५ इंची डिजिटल डिस्प्ले उपलब्ध करून दिल्याने कराड तालुक्यातील पहिली डिजिटल शाळा होण्याचा मान या शाळेस मिळाला आहे.


आधुनिकतेचा पाया शालेय जीवनापासून भक्कम करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना उपयुक्त असा डिजिटल डिस्प्ले देऊन अमोल येडगे यांनी आपल्या कर्मभूमीत जिल्हा परिषदेच्या शाळेला डिजिटल डिस्प्ले दिला. याचा विद्यार्थ्यांना नक्कीच चांगला उपयोग होईल अशी भावना अमोल येडगे यांनी यावेळी व्यक्त केली.


या डिस्प्लेचे उदघाटन अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व आबईचीवाडी गावचे सुपुत्र IAS अधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जमिला मुलानी, सुपने केंद्रप्रमुख निवास पवार, जगन्नाथ येडगे, बाजीराव सुर्वे, सरपंच तुकाराम येडगे, उपसरपंच मच्छिंद्र जाधव, संभाजी सुर्वे,संजय सुर्वे, ग्रामसेविका नीलम पवार, तात्यासो सुर्वे, मारुती सुर्वे, अंकुश काटकर, रमेश सुर्वे, बाबुराव नांगरे, दीपक क्षीरसागर, हणमंत येडगे, तानाजी सुर्वे, बाजीराव पवार, सुभेदार काटकर, अशोक सुर्वे तसेच शाळेचे मुख्याध्यापक उत्तम जांभळे, दीपाली पाटील, योगिता कणसे, नीलम शिंदे, ग्रामस्थ, विध्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.