कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरी हद्दी लगतच्या शैक्षणिक संस्था बंद
सातारा - कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठया शैक्षणिक संस्था ह्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्राच्या परिघाबाहेर ग्रामीण क्षेत्रात मोडतात परंतू या संस्था नागरी क्षेत्राला लागून आहेत. या शैक्षणिक संस्थेमध्ये निवासी विद्यार्थी वसतीगृहेही आहेत त्याचबरोबर दैनंदिन स्वरुपात शहरी व ग्रामीण भागातून विद्यार्थी येत जात असल्याने या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असल्याने महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रालगतच्या जवळपास असलेल्या अशा मोठया शैक्षणिक संस्था दि. 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
या सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्राप्रमाणेच या क्षेत्रात येणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या अनुषंगाने 10 व 12 वी च्या परीक्षा तसेच विश्वविद्यालयाच्या परीक्षा विहीत वेळापत्रकानुसार घेण्यात याव्यात. त्याचप्रमाणे आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही यासाठी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घ्यावी असे शासन परिपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.